Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Goa Budget Session: कॅश फॉर जॉब, Land Grab, सुलेमान खान, म्हादई, अपघात! भाजप विरोधकांना घाबरतेय; युरींची सरकारवर टीका

Goa Assembly Budget Session 2025: फेब्रुवारीच्या विधानसभा अधिवेशनाच्या दोन दिवसांच्या कामकाजावेळी आम्ही सरकाराच्या भ्रष्ट काराभारांचा पर्दाफाश केल्याने ते घाबरले आहेत.

Pramod Yadav

पणजी: गोवा सरकारने फक्त तीन दिवसांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च महिन्यात बोलवले आहे. यावरुन सरकारवर टीका करताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली. याचा राज्यावर परिणाम होणार आणि ही चिंतेची बाब आहे. भ्रष्टाचार, कमिशन, गैरव्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने भाजप विरोधकांच्या प्रश्नांना घाबरत आहे, असे आलेमाव यांनी म्हटले आहे.

विधानसभेचे अधिवेशन २४ मार्चपासून अवघ्या तीन दिवसांसाठी बोलावल्याबद्दल काँग्रेस नेते आलेमाव यांनी प्रतिक्रिया देताना, अधिवेशनाची कालावधी कमी केल्याने निषेध व्यक्त केला.

‘‘मार्चमध्ये केवळ तीन दिवस विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याच्या भाजपच्या निर्णयावरून सरकार विरोधकांना सामोरे जाण्यास घाबरत असून जनतेला न्याय देण्याची जबाबदारी टाळत असल्याचे दिसून येते. असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, ज्यावर चर्चा होणे गरजेचे आहे.

पण फेब्रुवारीच्या विधानसभा अधिवेशनाच्या दोन दिवसांच्या कामकाजावेळी आम्ही सरकाराच्या भ्रष्ट काराभारांचा पर्दाफाश केल्याने ते घाबरले आहेत. या निर्णयामुळे लोकशाहीच्या तत्त्वांवर गदा येते आणि आमदारांच्या अधिकारांवर सुद्धा गदा येते, असे आलेमाव यांनी म्हटले आहे.

‘‘सभापती रमेश तवडकर यांनी मार्चमहिन्यात दिर्घ कालावधीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावणार असल्याचे माध्यमांना सांगितले होते. प्रसारमाध्यमे त्यांना प्रश्न विचारतात तेव्हा ते प्रत्येक वेळी अशी आश्वासने देतात, पण मग ते आपले शब्द पाळण्यात अपयशी ठरतात. कारण त्यांचे मंत्री भ्रष्टाचार आणि कमिशनमध्ये गुंतलेले आहेत,’’ असे आलेमाव म्हणाले.

‘‘कॅश फॉर जॉब, जमीन रूपांतरण, सुलेमान सिद्दीकी प्रकरण, म्हादई, अपघात यावर चर्चा करण्याचे धाडस ते करतात का? विरोधकांना सामोरे जाण्यास आणि समाजिक कार्यकर्त्यांनाही सामोरे जाण्यास भाजप घाबरत आहे, म्हणून त्यांनी सत्तेचा गैरवापर करून रामा काणकोणकर यांना तुरुंगात पाठवले आहे. गोव्याची जनता या हुकूमशाही सरकारला माफ करणार नाही, असे आलेमाव म्हणाले.

'विधानसभेचे अधिवेशन कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा मी निषेध करतो. विधानसभेच्या अधिवेशनाच्या या तीन दिवसांतही संयुक्त विरोधक या भ्रष्ट सरकारचा पर्दाफाश करतील,’’ असे आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT