Goa News: कोणीच वारस नाही! शवागारात पडून असलेल्या 19 बेवारस मृतदेहांची सरकार लावणार विल्‍हेवाट

Goa Latest News: सर्व सरकारी कार्यालयातून आवश्‍‍यक असलेले परवाने त्‍वरित मिळावेत यासाठी उपाय घेण्‍याच्‍या सूचना करण्यात आल्या आहेत.
Goa News
DeadbodyDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळाच्‍या शवागारात जे १९ मृतदेह त्‍यांचा कुणीही वारस पुढे न आल्‍याने पडून राहिले आहेत. त्‍यांची विल्‍हेवाट जिल्‍हा प्रशासनातर्फे लवकरच लावली जाईल. त्‍यांच्‍यावर लगेच अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात येतील, अशी माहिती कायदा मंत्री आलेक्‍स सिक्‍वेरा यांनी दिली.

आज सिक्‍वेरा यांनी दक्षिण गोवा जिल्‍हाधिकारी कार्यालयात लोकांशी संवाद साधला. त्‍यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बैठकीत वन अधिकार कायद्याखाली सनद देण्‍यासाठी वन खात्‍याकडून ना हरकत दाखला मिळण्‍यास जाे उशीर होतो त्‍यावर चर्चा झाली. सर्व सरकारी कार्यालयातून आवश्‍‍यक असलेले परवाने त्‍वरित मिळावेत यासाठी उपाय घेण्‍याच्‍या सूचना आपण केल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

Goa News
Goa Budget Session 2025: कोणत्या क्षेत्राला काय मिळणार? 24 मार्चपासून सुरु होणार गोव्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

मागच्‍या बैठकीत बेवारस मृतदेहांचा प्रश्‍न उपस्थित केला होता, त्‍यावरही उपाय घेण्‍यात येणार आहे. येत्‍या आठवड्यात यासंबंधीचे सोपस्‍कार पूर्ण केले जातील. आपण मुख्‍यमंत्र्यांशी चर्चा केली आहे, असे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Chimbel Illegal Borewells
Goa Under 19 Cricket Team
Goa Farmers Fertilizer Advisory
Goa Schools Religious Activities Ban
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com