Goa Government Job Fraud canva
गोवा

Pooja Naik Case: '..भाजप नेत्यांना केलेल्या कॉलचा संदर्भ सापडेल'; Cash For Job प्रकरणी पालेकर यांनी केली सीडीआर रिपोर्टची मागणी

Amit Palekar demands CDR report in Cash for Job case: पोलिसांनी खऱ्या अर्थाने पूजा नाईकचा दोन वर्षांचा सीडीआर (कॉल डिटेल्स रिपोर्ट) तपासावा. त्यात त्यांना भाजपमधील विविध नेत्यांना केलेल्या कॉलचा संदर्भ सापडेल, असे ॲड. अमित पालेकर म्हणाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Cash For Job Scam pooja naik Case

पणजी: माझ्या घराभोवती तीन दिवस साध्या वेशातील पोलिस फिरत होते. माझ्यावर ते पाळत ठेवून आहेत. यावरून सरकार आम्हाला भीती दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे, असे वाटते. पोलिसांनी खऱ्या अर्थाने पूजा नाईकचा दोन वर्षांचा सीडीआर (कॉल डिटेल्स रिपोर्ट) तपासावा. त्यात त्यांना भाजपमधील विविध नेत्यांना केलेल्या कॉलचा संदर्भ सापडेल, असे ॲड. अमित पालेकर म्हणाले.

इंडिया आघाडीतर्फे आज ‘कॅश फॉर जॉब’प्रकरणी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ॲड. पालेकर यांच्यासोबत आमदार कार्लुस फेरेरा आणि विजय सरदेसाई उपस्थित होते. सरदेसाई म्हणाले की, महाराष्ट्रात निवडणुकीनंतर विरोधकांची संख्या कमी झाली म्हणून गोव्यात विरोधकच शिल्लक ठेवायचे नाहीत, असे भाजपला वाटत असेल तर ते होऊ दिले जाणार नाही.

पोलिसांनी खरे तर स्वतंत्रपणे वागायला हवे, त्यांनी कोणाच्या दबावाखाली काम करू नये, नोकरी घोटाळ्यातील मुख्य आरोपी शोधण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही सरदेसाई यांनी दिला. सरकारकडे ३३ आमदार आहेत, विरोधात सातजण आहेत. विरोधकांनी ‘कॅश फॉर जॉब'''' प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे आणि सत्ताधारी पक्षातील मंत्री बाबूश मोन्सेरात यांनीही तीच मागणी केल्याची आठवण सरदेसाई यांनी करून दिली.

उपजिल्हाधिकाऱ्यांना ‘तो’ अधिकार नाही!

काँग्रेसने शनिवारी आझाद मैदानावर आंदोलन केले होते. मी नियोजित कार्यक्रमांमुळे या आंदोलनात सहभागी होऊ शकलो नाही, असा निर्वाळा देत उपजिल्हाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर आंदोलन करण्यास २२ जणांवर सहा महिन्यांची बंदी घातली आहे, ती कायद्यानुसार नाही, असे ॲड. फेरेरा म्हणाले. उपजिल्हाधिकाऱ्यांना तशी बंदी घालण्याचा अधिकार नाही. शिवाय आंदोलकर्त्यांना अटक करून बॉंडवर सुटका केली, तोही अधिकार त्यांना नाही. त्यांनी दिलेल्या आदेशाला आम्ही आव्हान देणार आहोत, असेही फेरेरा म्हणाले.

‘पोलिसांनीच केला सतरकरचा खून’

‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील संशयित सतरकर याने आत्महत्या केली. खरे तर पोलिसांनीच सतरकरचा खून केला, असा माझा आरोप आहे. मी नेहमी पोलिसांच्या वेशात नसलेल्या अधिकाऱ्याच्या वावराविषयी उल्लेख केला, त्याचे तुषार वेर्णेकर असे नाव असून, तो मुख्यमंत्र्यांच्या आसपास वावरत असतो. सर्व एसपी, डीवायएसपी आणि पोलिस विभागावर त्याचे नियंत्रण आहे. तुषारला अशा अनेक गोष्टी माहीत आहेत, ज्या भाजपला अडचणीत आणू शकतात, असेही ॲड. पालेकर यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Australia: मुसळधार पाऊस, विजेचा कडकडाट... वीज पडून एका खेळाडूचा मृत्यू, 'या' कारणामुळं भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया सामना रद्द

Fish Price Hike: मासे खाणं महागलं... सुरमई, पापलेट, कोळंबीची किंमत पाहून पळेल तोंडचं पाणी

Snake Attack Video: साप पकडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद! सापाने अचानक केला हल्ला, नंतर काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहा

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

SCROLL FOR NEXT