cases of alcoholism Two arrested at Margao Konkan railway station Dainik Gomantak
गोवा

दारू बाळगल्या प्रकरणी मडगाव कोकण रेल्वे स्थानकावर दोघांना अटक

पुढील तपास पोलिस करत आहेत

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : मडगाव कोकण रेल्वे स्थानकावर बेकायदेशीर दारू बाळगल्याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी उत्तरप्रदेश येथील दोन युवकांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. आज 4.10 वाजता रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर पोलीस कॉन्स्टेबल विराज नाईक देसाई टेहाळणी करीत असताना त्यांना दोन युवक संशयास्पद आढळले. त्यांच्या बॅगची तपासणी केली असता, त्यांच्या 4 बॅगमध्ये 180 मिलीच्या 245 बाटल्या सापडल्या. या सर्व बाटल्या व्हिस्की दारूच्या (alcohol) होत्या.

पोलिसांनी (police) जप्त केलेल्या या सर्व बाटल्या नंतर अबकारी खात्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. कारवाई (Action) केलेल्या तरुणांची नाव अनुज रावत (वय18), व राजन रावत (वय22) अशी आहेत. या विषयी पुढील तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान, भूमापन आराखडा खोटी केल्याच्या आरोपावरून आणखी एका जमीन घोटाळ्यात फातोर्डा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सूत्रांनी सांगितले की, या प्रकरणातील दोन आरोपी, मारियानो लॅब्रँचेस आणि प्रकाश सामंत यांनी उटोर्डा येथील मालमत्तेची जमीन सर्वेक्षण योजना बनावट बनवली आणि जमीन (land) नोंदणी अधिकार्‍यांसमोर विक्रीचे डीड करण्यासाठी मूळ म्हणून सादर केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT