Police Complaint Dainik Gomantak
गोवा

Margao Crime: साधू, भटजीबाबत आक्षेपार्ह विधान; हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कुंकळ्ळीत गुन्हा नोंद

Goa Crime News: धार्मिक तेढ निर्माण करुन दोन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न डिसिल्वा यांनी केल्याचा आरोपही परेरा यांनी केला आहे.

Pramod Yadav

मडगाव: साधू, भटजीबाबत आक्षेपार्ह विधान करुन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोशल मिडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करत साधू आणि भटजीविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

चिंचणी येथील माल्कम परेरा यांनी याप्रकरणी अँथनी डिसिल्वा (आंबेली, असोळणा) यांच्या विरोधात कुंकळ्ळी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. डिसिल्वा यांनी एका व्हिडिओद्वारे साधू, भटजीबाबत आक्षेपार्ह विधान करुन हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच, हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करुन व्हायरल केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

धार्मिक तेढ निर्माण करुन दोन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न डिसिल्वा यांनी केल्याचा आरोपही परेरा यांनी केला आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे चितावणीखोर वक्तव्य करणे, धार्मिक भावना दुखावणे तसेच समाजाचा एकोपा धोक्यात आणण्याची कृती करणे याप्रकरणी अँथनी यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. कुंकळ्ळी पोलिस याप्रकरणाचा अधिक तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT