Crime News  Dainik Gomantak
गोवा

Priol Hill: प्रियोळातील डोंगर कापणी प्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा

Priol Hill Cutting Case: मोठ्या प्रमाणात डोंगर कापणी करून जमिनीचे प्लॉट तयार करणे किंवा मोठी इमारत संकूल उभारण्यासाठी ही बेकायदा कापणी केल्याचा संशय

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: फोंडा तालुक्यातील प्रियोळ भागात बेकायदा डोंगर कापणी केल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध म्हार्दोळ पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सामाजिक कार्यकर्ते व आरटीआय कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतर कारवाईला चालना मिळाली असून गोव्याचा वायनाड करण्याचा सरकारचा विचार आहे का, असा सवाल केल्यामुळे विधानसभेत या प्रकरणी प्रश्‍न उपस्थित झाला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

दोन ठिकाणी प्रियोळ भागातील डोंगराची कापणी चालल्याचे स्पष्ट झाले असून फोंड्यातील नगर नियोजन खात्याचे कर्मचारी प्रेमानंद आकारकर यांच्या तक्रारीनुसार म्हार्दोळ पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला आहे. या डोंगर कापणी प्रकरणी कोणत्याही प्रकारचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यात आलेले नाहीत. त्यातच मोठ्या प्रमाणात डोंगर कापणी करून जमिनीचे प्लॉट तयार करणे किंवा मोठी इमारत संकूल उभारण्यासाठी ही बेकायदा कापणी केल्याचा संशय आरटीआय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला होता.

या ठिकाणी केलेल्या या डोंगर कापणीत मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करून जमीन सपाट केल्याचे निदर्शनास आले आहे. म्हार्दोळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील चौकशी पोलिस निरीक्षक योगेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक झाकीर हुसेन करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mini Goa: प्रसिद्ध पर्यटनस्थळ मिनी गोवा येथे चार शालेय मुले बुडाली, एकाचा मृतदेह सापडला

Ganesh Chaturthi: 'जयदेव.. जयदेव'! गावागावांत घुमतोय आरतीचा निनाद; भजनाचे स्‍वर अन्‌ फुगड्यांच्‍या ताल

Matoli: 'यंदाच्या वर्षी नवीन काय'? दुर्मिळ फळांची-वनस्पतींची, औषधी गुणधर्मांची लाखमोलाची 'माटोळी'

Goa Live Updates: माटोळीत साकारले ऑपरेशन सिंदूर

Fatorda: नागरिकांच्या आरोग्याशी खेळ! बेकायदेशीर मासळी विक्रीमुळे परिसर दुर्गंधीमय; डासांची पैदास वाढली

SCROLL FOR NEXT