Goa Carnival 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Carnival: पणजीत 10 फेब्रुवारीला रंगणार कार्निव्‍हल परेड

Goa Carnival: तीन दिवस कार्यक्रम : 58 वर्षे योगदान देणारे फ्रांकित मार्टिन्‍स यांना गौरविणार

दैनिक गोमन्तक

Goa Carnival: पणजीत व्‍हिवा कार्निव्हल दि. 10 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्‍यात आला आहे. ही परेड बांदोडकर मार्गावर 10 रोजी काढली जाईल. दरम्‍यान, कार्निव्हलसाठी 58 वर्षे योगदान देणारे फ्रांकित मार्टिन्‍स यांचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती पणजी कार्निव्हल समितीचे अध्‍यक्ष तथा महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली.

महानगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत मोन्‍सेरात बोलत होते. याप्रसंगी आयुक्त क्लेन मेदेरा, उपमहापौर संजीव नाईक, नगरसेवक बेंटो लॉरेन्‍स, समिती सचिव तथा अभियंते विवेक पार्सेकर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

मोन्सेरात म्हणाले, या तीन दिवसांचा सांगीतिक कार्यक्रम सादर होणाऱ्या ‘सांबा स्क्वेअर’ची उभारणी गार्सिया उद्यानाजवळील रस्त्यावर केली जाणार आहे.

तेथे नील रिबेरो यांचाही कार्यक्रम होईल. या सांबा स्क्वेअरमध्ये जाण्यासाठी शुल्क आकारले जाते. शिवाय तेथील स्टॉल्‍सना दिवसाप्रमाणे महानगरपालिका भाडे आकारते. त्यातून चांगला महसूल प्राप्त होत असतो.

कार्निव्‍हल परेड वेळेत सुरू होईल. पोलिस व इतर खात्यांशी याबाबत चर्चा केली जाईल. नियमबाह्य चित्ररथांना स्‍थान दिले जाणार नाही. इच्‍छुक चित्ररथ मंडळ, संस्थांना अर्ज देण्यास उद्या बुधवारपासून सुरुवात होईल. 5 फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
- रोहित मोन्सेरात, महापौर तथा पणजी कार्निव्हल समितीचे अध्‍यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT