Goa Politics: उमेदवारीसाठी येणाऱ्यांना प्रवेश नाहीच: सदानंद तानावडे

Goa Politics: भाजपचा कोणीही नेता सावळांच्‍या संपर्कात नाही
Goa Politics:
Goa Politics:Dainik Gomantak

Goa Politics: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या कोणालाही भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. उलट निवडणूक होईपर्यंत प्रत्येक मतदारसंघातून शंभर ते दीडशे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

Goa Politics:
Breast Cancer: भीषण वास्तव! गोव्यात 1 लाखात 55 महिलांना स्‍तनाचा कर्करोग...

माजी आमदार नरेश सावळ यांनी भाजपचे नेते आपल्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. त्यावर तानावडे यांनी सावळ यांच्या संपर्कात कोणीही नाही. केवळ राजकीय वातावरण तापवण्‍यासाठी अशी वक्तव्ये केली जात असल्‍याचे सांगितले.

भाजपकडे लोकसभा आणि विधानसभेसाठी अनेक उमेदवार आहेत. तरीही भाजपमध्ये प्रवेशासाठी अनेकजण इच्छुक असू शकतात. मात्र लोकसभा निवडणुकीच्‍या अनुषंगाने निश्चितपणे कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

उमेदवारीची अपेक्षा न बाळगता पक्षप्रवेश करण्यास कोणी तयार असेल तर त्यांचा विचार करता येईल. पण उमेदवारीवर डोळा ठेवून भाजपमध्ये येऊ पाहणाऱ्यांचे सध्या स्वागत न करण्याचे ठरविले आहे, असे तानावडे म्‍हणाले.

गोवा फॉरवर्डचे विलीनीकरण अफवा

गोवा फॉरवर्ड हा राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये विलीन होणार या चर्चेत तथ्य नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

Goa Politics:
Sea Food In Goa: जाणून घ्या, सीफूडसाठी प्रसिद्ध गोव्यातील बीच

अशा चर्चा या निव्वळ अफवा आहेत. अधिक माहिती हवी असेल तर विजय सरदेसाई यांनाच विचारा, असे मुख्यमंत्र्यांनी याबाबत विचारल्‍यावर सांगितले.

तर, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी प्रत्येक निवडणुकीआधी अशी अफवा पसरवण्यात येते असे सांगून येत्या अधिवेशनात सरकारला धारेवर धरू, असे म्‍हटले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com