Carlos Ferreira on Goa Mining : राज्यातील खाण व्यवसाय बंद किंवा पूर्ववत करण्यास काँग्रेसने कधीच विरोध केलेला नाही. उलट भाजप सरकारने या खाणी बंद पाडत अनेकांचे रोजगार हिरावून घेतले. सरकारने खाणींचा लिलाव करण्यापेक्षा स्वतः खाणी चालवाव्यात. यामुळे समस्त गोमंतकीय लाभ मिळू शकतो, असे मत हळदोणाचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी व्यक्त केले.
काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, खाणी पूर्ववत करण्यास आमचा पाठिंबा आहे. मात्र, त्या सुरू करताना पक्षपात, भ्रष्टाचाराला थारा देऊ नये. सरकारने आता 2023 पर्यंत खाणी सुरू करण्याचा दावा केला असला तरी त्याविषयी शंका आहे. लिलावामुळे खासगी मंडळी केवळ आपल्याच लोकांना रोजगार देतील. पण सरकारने खाणी स्वतः चालविल्यास राज्याचा फायदा होईल, असे मत कार्लुस फेरेरा यांनी व्यक्त केले. तर सरकारने खाणी पारदर्शकपणे सुरू कराव्यात. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून त्यांचा गैरवापर करू नये. कारण, 2022 च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने मतदारांना नोकऱ्यांचे आमिष दाखविले होते, अशी टीका विजय भिके यांनी केली.
सार्वजनिक सुनावणी आवश्यक
खाणी सुरू करताना समग्र अर्थव्यवस्थेचा विचार करावा. सरकारने खाणी 2023 पर्यंत सुरू करणार असे म्हटले असले, तरी प्रत्यक्षात वेळ लागू शकतो. कारण सर्व सोपस्कारांप्रमाणे खाणी सुरू कराव्या लागतील. याशिवाय, सार्वजनिक सुनावणी घ्यावी लागेल, याकडे अॅड. फेरेरा यांनी लक्ष वेधले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.