Goa Education : आता विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदव्या घेता येणार; नियमावली जाहीर

‘यूजीसी’ची मान्यता : आवश्‍यक बदल करण्याच्या उच्च शिक्षण संस्थांना सूचना
College
CollegeDainik Gomantak

Goa Education : पदवी शिक्षण घेतानाच यापूर्वी एखादा पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करता येता होता. परंतु आता तुम्हाला एखादा पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम करतानाच आणखी एक पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम देखील करता येणार आहे.

होय, विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन शैक्षणिक पूर्णवेळ अभ्यासक्रम करण्याला मान्यता दिली असून त्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या आहेत. आयोगाच्या या निर्णयामुळे आता विशीत-एकविशीत दोन पदव्या मिळू शकतील.

एप्रिल महिन्यातच दिली मान्यता

आयोगाच्या निर्णयानुसार आतापर्यंत पदवी अभ्यासक्रम करताना विद्यार्थ्यांना पदविका करता येत होती. परंतु आता एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम करण्याची मुभा आहे. या संदर्भातील प्रस्तावाला आयोगाने एप्रिलमध्येच मान्यता दिली आहे. त्यानुसार अंमलबजावणी करण्यासाठी आता आयोगाने उच्च शिक्षण संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ नुसार हा निर्णय उपयुक्त आहे.

College
Goa Road Guide Line: सावर्शेतील रस्त्यांवर सूचना फलक हवेत!

स्टॅट्युटरी बॉडी

विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पूर्णवेळ शैक्षणिक अभ्यासक्रम करता यावेत आणि त्याअनुषंगाने विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या रचनेत आवश्यक ते बदल करावेत, हे आयोगाने मार्गदर्शक सूचनांद्वारे स्पष्ट केले आहे. अशाप्रकारे अभ्यासक्रम करण्यास मान्यता देण्यासाठी देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांनी स्टॅट्युटरी बॉडी’च्या साहाय्याने यंत्रणा विकसित करावी, असे आयोगाने सुचविले आहे.

मार्गदर्शक उपाय

  • विद्यार्थी एकाच वेळी दोन पूर्णवेळ अभ्यासक्रम करू शकतात.

  • या दोन्ही अभ्यासक्रमांच्या वेळा वेगवेगळ्या असायला हव्यात.

  • यूजीसी, केंद्र सरकार यांची मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल.

  • ‘पीएच.डी. व्यतिरिक्त अन्य अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच ही सुविधा लागू असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com