Carlos Ferreira X
गोवा

Cash For Job घोटाळ्याची पारदर्शक चौकशी शक्य नाही, स्वतंत्र आयोगाच्या मागणीवर फेरेरा ठाम; महासंचालकांनी घेतला सविस्तर आढावा

Goa Government Job Fraud: नोकरी प्रकरणात गुंतलेले अजून अनेक सांगाडे बाहेर येतील त्यामुळे आयोगामार्फत चौकशी व्हायला हवी, असे मत काँग्रेसचे आमदार व ॲड. कार्लुस फेरेरा यांनी व्यक्त केले. घोटाळा प्रकरणातील तपासाचा आज पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी आढावा घेतला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Cash For Job Scam Carlos Ferreira Demand for Independent Commission DGP Alok Kumar Reviews Investigation

पणजी: सरकारी नोकरी विक्रीप्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. या प्रकरणांची पारदर्शकपणे चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालय निवृत्त न्यायमूर्तींचा समावेश असलेल्या स्वतंत्र एकसदस्यीय आयोगाची नेमणूक करण्याची गरज आहे.

पोलिसांनी आतापर्यंत ज्यांना अटक केली तसेच चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे ते भाजपचे कार्यकर्ते किंवा संबंधित आहेत का, याचे स्पष्टीकरण करावे. या प्रकरणात गुंतलेले अजून अनेक सांगाडे बाहेर येतील त्यामुळे आयोगामार्फत चौकशी व्हायला हवी, असे मत काँग्रेसचे आमदार व ॲड. कार्लुस फेरेरा यांनी व्यक्त केले.

या नोकरी विक्री प्रकरणात काही सरकारी कर्मचाऱ्यांनी दलाल बनून लोकांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखोंना लुबाडले आहे. काही निष्पाप लोकांनी सरकारी नोकरी मिळवण्याच्या आशेने कर्जे काढून तसेच जमा असलेली रक्कम दलालांकडे दिली. सध्या पोलिस जो तपास करत आहेत, तो ट्रेलर असून त्याच्या मुळापर्यंत जायचे झाल्यास पोलिसांना काही अधिकार हवे आहेत. ते तक्रारदार जी काही माहिती देतील किंवा जे काही पुरावे देतील त्याच्या आधारावर चौकशी करतील.

सरकारी नोकऱ्या विक्रीचा महाघोटाळा कोणाचा आशीर्वाद, लागेबांधे तसेच संबंध असल्याशिवाय शक्य नाही. या प्रकरणांची खोलवर चौकशी करण्यास पोलिस गेल्यास काही मोठ्या धेंडांची नावे समोर येऊ शकतात. त्यामुळे या घोटाळ्यावर पांघरूण घालण्याचा, चौकशी पूर्ण झाल्याचे सांगून ती बंद करण्याचा अथवा ज्यांनी पैसे घेतले आहेत त्यांना ते पैसे तक्रारदारांना परत करण्यास सांगून या प्रकरणातून नाव समोर येणार नाही याचे सर्व ते प्रयत्न करण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्तेत असलेल्या सरकारकडे खालपासून ते वरतीपर्यंत सर्व अधिकार असतात. त्यामुळे पारदर्शक चौकशी होणे शक्य नाही, असे फेरेरा म्हणाले.

महासंचालकांनी घेतला आढावा

सध्या गोव्यात गाजत असलेल्या ''कॅश फॉर जॉब'' घोटाळा प्रकरणातील तपासाचा आज पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी आढावा घेतला. त्यांनी मडगाव पोलिस उप मुख्यालयाला भेट देत दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दक्षिण गोव्यात म्हार्दोळ, फोंडा, वास्को आणि काणकोण या चार ठिकाणी असे घोटाळे उघडकीस आले असून सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने शेकडो लोकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. सर्व मोठी प्रकरणे बहुतांश दक्षिण गोव्यातच घडलेली असून या सर्व प्रकरणांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Cash For Job Scam: 'प्रत्येकाला वाटतंय मीच CM, गोवा सरकारमध्ये सुरुय सर्कस, सगळे जोकर खेळतायेत'; LOP युरींची टीका

Ranji Trophy 2024: वाल्लोर! रणजीत गोव्याचा दमदार विजय; एक डाव, 551 धावांनी अरुणाचलवर मात

Goa CBI Raid: पणजीत लाच घेताना आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला CBI नं रंगेहात पकडलं

Goa News: गोव्याच्या किनारी फोटोग्राफी भोवली, बिहारच्या तरुणाकडून 25 हजार दंड वसूल; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT