Goa Education: गोव्यात शिक्षणात स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य! ‘एनईपी’ करणार अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकात बदल

New Curriculum and Textbooks in Goa: राज्यातील सर्व स्तरांवर एनईपी लागू करण्यासाठी राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) कंबर कसली असून इयत्ता पहिली ते सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार करण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.
New Curriculum and Textbooks for Grades 1 to 6 in Goa
Goa EducationDainik Gomantak
Published on
Updated on

NEP Implementation SCERT Develops New Curriculum Textbooks for Primary Grades

पणजी: राज्यात नव्या शिक्षण धोरणाची अमंलबजावणी सुरू असून यंदा नववीत ‘एनईपी’नुसार अभ्यासक्रम राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नवी पाठ्यपुस्तक निर्मिती सुरू झाली आहे.

राज्यातील सर्व स्तरांवर एनईपी लागू करण्यासाठी राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) कंबर कसली असून इयत्ता पहिली ते सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार करण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.

एनसीईआरटीने तयार केलेल्या पुस्तकांमध्ये गोव्याशी निगडीत मुद्द्यांना २० टक्के स्थान दिले जाणार आहे. उदाहरणार्थ, जर समाजविज्ञान विषय आहे, तर स्थानिक मुद्यांचा पाठांमध्ये समावेश राहणार असून ते प्रमाण २० टक्के असेल.

राज्यातील शाळांसाठी प्राथमिक आणि मध्यम स्तरासाठी अभ्यासक्रम तयार करण्यासाठी शिक्षण तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. विषयानुरुप एकूण १२० तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. एकूण दहा विषयांची पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहेत. या तज्ज्ञांना एनसीईआरटीच्या दहा तज्ज्ञ ज्यांनी राष्ट्रीय स्तरावर पाठ्यपुस्तकाची निर्मिती केली आहे. त्यांच्याकडून पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम तयार करताना गोवा केंद्रीत विषय पाठ्यपुस्तकात यावेत, यासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन आले होते.

थोडक्यात महत्त्वाचे

नवी पाठ्यपुस्तके येत्या शैक्षणिक वर्षात लागू

२० टक्के स्थानिक मुद्यांना प्राधान्य

दहा विषयांचे अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक निर्मिती सुरू

‘एनसीईआरटी’कडून विषय तज्ज्ञांना मार्गदर्शन

विविध विषयांच्या सुमारे १२० अभ्यासकांचा सहभाग

New Curriculum and Textbooks for Grades 1 to 6 in Goa
Goa Education: नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिल महिन्यात सुरु होण्याची शक्यता; काय असेल मुख्यमंत्र्यांचा निर्णय?

मसुदा निर्मिती सुरू

‘एनसीईआरटी’चे आर.आर.कुरीयंग यांच्या नेतृत्वाखालील पथक दाखल झाले आहे. येत्या २९ नोव्हेंबरपर्यंत पाठ्यपुस्तकांचा मसुदा तयार करण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com