Carlos Ferreira Congress MLA
Carlos Ferreira Congress MLA  Dainik Gomantak
गोवा

Congress MLA Defection : दोन दिवसांत 'त्या' आठ आमदारांविरुद्ध अपात्रता याचिका

गोमन्तक डिजिटल टीम

Congress MLA Defection : काँग्रेसच्या बंडखोर 8 आमदारांविरुद्ध काँग्रेस पक्ष येत्या दोन ते तीन दिवसांत अपात्रता याचिका दाखल करणार आहे. काही माहितीसाठी आम्ही थांबलो होतो, त्यामुळे जरा उशिर झाला. आता याचिका तयार असून ती दाखल करणार, अशी माहिती हळदोणेचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी दिली.

अनेकदा सभापती हे ठराविक राजकीय पक्षाचे नेते असतात, मात्र सभापतींनी नेहमीच निर्णय हे न्यायिक तत्वावर द्यायचे असतात. मुळात काँग्रेस पक्षाचे विलिनीकरण झालेले नाही. पक्षाचा छोटासा गट दुसर्‍या पक्षात गेला म्हणजे संपूर्ण मूळ राजकीय पक्षाचे विलिनीकरण झाले असे म्हणता येणार नाही. जर सभापतींनी याचिका फेटाळलीच तर न्यायालयात यास आव्हान देत विलिनीकरणाची खरी व्याख्या जाणून घेण्याची आमची तयारी आहे, असे अ‍ॅड. कार्लुस फेरेरा म्हणाले.

दरम्यान, उशिरापर्यंतच्या संगीतरजनींविषयी न्यायालयाने दखल घेत आता पोलिसांना अशा बेकायदा पार्ट्यांवर कडक कारवाईचे निर्देश दिलेत. याविषयी काँग्रेस आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा म्हणाले की, या संगीतरजनींचा लोकांना तसेच विद्यार्थ्यांना त्रास होतोय. याशिवाय लोकांच्या आरोग्यावर याचा विपरित परिणाम होतो. काहींच्या मते संगीतरजनींवर निर्बंध लादले म्हणजे पर्यटनावर घाला असे संबंधितांचे मत. मात्र यापूर्वी गोव्यात रात्री उशिरापर्यंत पार्ट्यां होत नव्हत्या. तरीही चांगले दर्जेदार पर्यटक यायचे. परंतु सध्या पर्यटनाच्या नावाने काहीही सुरु आहे. लोक रस्त्याकडेला थांबून स्वयंपाक बनवतात तर काहीजण शौच करतात, असे म्हणत फेरेरा यांनी बेशिस्त पर्यटनावर संताप व्यक्त केला.

सुरुवातीला किनार्‍याजवळील घरांमध्ये किंवा मच्छिमार बांधवांच्या घरी पर्यटक वास्तव्य करायचे आणि गोव्याची संस्कृती जाणून घ्यायचे. हे चित्र आता बदलले असून सध्या पर्यटक हे रात्रभर पार्ट्यां करतात आणि दिवसभर झोपतात. हे कसले पर्यटन आहे. आम्हाला पर्यटकांनी गोव्यात येऊन गोव्याची संस्कृती समजून घेतली पाहिजे. सध्या ‘इट, स्लीप, ड्रींक व पार्टी’ हा प्रकार सुरु असून आम्हाला हे चित्र नको, असेही फेरेरा म्हणाले.

कचराप्रश्नी बोलताना अ‍ॅड. फेरेरा म्हणाले की, अलिकडे लोक बिनदिक्कतपणे रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात. ते बस आणि वाहनांमधून कचर्‍याच्या पिशव्या पुलावरुन नदीत फेकतात. अशाप्रकारे आम्ही नदी प्रदूषित करु लागलो तर आम्हाला सर्वांना आजारपणाला सामोरे जावे लागेल. तुमच्याकडे कचरा उचलण्याची सोय नसेल तर लोकांनी पंचसदस्य, नगरसेवकांशी संपर्क साधावा. आणि गरज पडल्यास स्थानिक आमदारांना विश्वासात घ्या. ज्याप्रकारे आम्ही घरात कचरा कुठेही टाकत नाही, तशीच काळजी आपण गोव्याची घेतली पाहिजे. गोवा हे प्रत्येकाचे घर आहे. गोव्याला स्वच्छ व सुदृढ ठेवायचे असल्यास लोकांनी कचरा कुठेही फेकून नदीपात्र किंवा निसर्ग प्रदूषित करु नये, असे आवाहन अ‍ॅड. फेरेरा यांनी यावेळी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT