Goa Congress : गोवा काँग्रेसमध्ये मोठे बदल; पक्षाला उभारी मिळणार का?

काँग्रेसच्या आठ आमदारांनी पक्षांतर केल्यानंतर प्रथमच गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाने आपल्या नव्या समितीची घोषणा केली आहे.
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

Goa Congress : काँग्रेसच्या आठ आमदारांनी पक्षांतर केल्यानंतर प्रथमच गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाने आपल्या नव्या समितीची घोषणा केली आहे. या काँग्रेस आमदारांच्या बंडानंतर राज्यातील काँग्रेसची फेररचना करणे अपरिहार्य बनले होते. तरीही पक्षाला आलेली मरगळ आणि सक्रिय कार्यकर्त्यांचा अभाव यामुळे रखडलेली फेररचना जाहीर केली आहे. या समितीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली घोषणा करण्यात आलेल्या समितीत एम. के. शेख यांना वरिष्ठ उपाध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे.

राष्ट्रीय काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी  गोव्याच्या  नव्या समितीला मान्यता दिली आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेनिमित्ताने मुख्य कार्यालयाबाहेर आहेत. अशातच हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभेच्या निवडणुका होत असल्याने बहुतांश नेतेमंडळी कामात व्यस्त आहेत. त्यामुळे गोव्याच्या पक्षीय पुनर्रचनेला वेळ झाल्याचे एका कार्यकर्त्याने सांगितले.

समितीच्या उपाध्यक्षपदी प्रमोद साळगावकर, सुभाष फळदेसाई, तुलियो डिसोझा, सुनील कवठणकर आणि विठोबा देसाई यांची निवड करण्यात आली आहे. तर इव्हरसन वालीस, विरियातो फर्नांडिस, राजेश वेरेकर, मोरेनो रिबेलो, मनिषा उसगावकर, सावियो डिसोझा, प्रदीप नाईक, श्रीनिवास खलप, जितेंद्र गावकर, जोसेफ वाझ, विजय भिके, वरद म्हार्दोळकर, अर्चित नाईक आणि रॉयला फर्नांडिस यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.

कार्यकारी समितीत आल्तिन गोम्स, बाबी बागकर, गुरुदास नाटेकर, एल्विस गोम्स, कार्लेस आल्मेदा, विकास प्रभुदेसाई, नितीन चोपडेकर, मेघःश्याम राऊत, नाझिर बेग, शंभू भाऊ बांदेकर, सुनिता वेरेकर, धर्मा चोडणकर, सुरेंद्र फुर्तादो, प्रदीप देसाई यांची नेमणूक झाली आहे.

Goa Congress
Goa Rain Updates : गोव्यात येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता

राजकीय घडामोडी समितीमध्ये प्रभारी दिनेश गुंडू राव, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार फ्रान्सिस सार्दिन, एदुआर्द फालेरी, आमदार कार्लुस फेरेरा, आमदार आल्टन डिकॉस्ता, रमाकांत खलप, गिरीश चोडणकर, एम.के. शेख, विर्यातो फर्नांडिस आणि बीना नाईक यांचा समावेश करण्यात आला आहे. अमरनाथ पणजीकर यांच्याकडे गोवा काँग्रेसच्या प्रसारमाध्यम विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर खजिनदार म्हणून ऑर्विले दोरादो यांची नेमणूक करण्यात आली आहे.

ही फेररचना जाहीर केल्याने अनेक दिवसांपासून असलेली कार्यकर्त्यांची मागणी फळाला आली असली तरी याचा पक्षाच्या उभारणीला किती फायदा होणार हे येणारा काळच सांगेल. काही का असेना देर आयी दुरुस्त आयी, अशी सध्या काँग्रेस पक्षाची गोव्यात स्थिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com