Carlos Ferreira About Water Crisis In Goa
पणजी: ‘हर घर नळ, पण जल कुठे?’ असा सवाल हळदोणे विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी सरकारला सोमवारी (ता.२४) अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केला.
आपल्या मतदारसंघातील नागरिकांना रोज १५ मिनिटेसुद्धा पाणी मिळत नाही आणि दुसरीकडे पाण्याच्या टंचाईच्या भागांमध्ये पोहण्याच्या तलावांसह मोठ्या प्रकल्पांना बिनधास्त परवानग्या दिल्या जात आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
ॲड. कार्लुस फेरेरा म्हणाले की, नव्याने बंगल्यांना आणि जलतरण तलाव असलेल्या प्रकल्पांना परवानग्या दिल्या जात आहेत. हे प्रकल्प स्वतःच्या पाण्याची व्यवस्था करतील, असे सांगितले जाते; पण प्रत्यक्षात हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाण्याचाच वापर करत आहेत.
सरकार हे कसे नियंत्रणात आणणार आहे? गावात लोक पाण्यासाठी हवालदिल झाले आहेत आणि दुसरीकडे नव्या वसाहतींमध्ये २४ तास पाण्याचा पुरवठा होत आहे. आमच्या मूळ गोमंतकीयांना पाणी मिळत नाही; पण नव्या वसाहतींना अखंडित पाणीपुरवठा होत आहे.
ॲड. कार्लुस फेरेरा यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उत्तरावरही नाराजी व्यक्त केली. सरकारच्या म्हणण्यानुसार, गोव्यात कुठेही तीव्र पाणीटंचाई नाही, फक्त पाईप फुटल्यास किंवा देखभालीच्या वेळी तात्पुरता पुरवठा खंडित होतो. या उत्तरावर संताप व्यक्त करत फेरेरा म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी माझ्यासोबत त्या भागात यावे आणि लोकांच्या व्यथा ऐकाव्यात, मग हेच उत्तर इथे द्यावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.