गोवा

Ponda: कार्गो ट्रक विद्युत डिपीला धडकला; केबल, ट्रान्सफॉर्मरचे नुकसान

बेथोरा औद्योगिक वसाहत येथील घटना

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: कार्गो ट्रक विद्युत डिपीला धडकून अपघात झाला आहे. फोंडा तालुक्यातील बेथोरा औद्योगिक वसाहत (Bethora industrial estate, Ponda) येथे गुरूवारी (दि.28) ही घटना घडली. या अपघातात केबल, ट्रान्सफॉर्मर आणि पोलचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या केबल, ट्रान्सफॉर्मर आणि पोलची दुरूस्ती करत असल्याचे गोवा विद्युत खात्याने स्पष्ट केले आहे.

गोवा विद्युत खात्याने याबाबत माहिती दिली आहे. बालाजी रोडवेएज, गोवा या कंपनीचा हा कार्गो असून तो डिपीला धडकल्याचे फोटोतून समोर आले आहे. गुरूवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, गोव्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. बुधवारी रात्री झुआरी पुलावरून नदीत कार कोसळली, त्यात चार लोकांनी आपला जीव गमावला. बारा तासांच्या शोध मोहिमेनंतर ही कार नदीतून बाहेर काढण्यात आली. तर आज (शुक्रवारी) पहाटे चिखलीतील रिमा बारजवळच असलेल्या सांडपाण्याच्या पुलावरुन कार नाल्यात कोसळली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Shack Fire: उतोर्डा येथील प्रसिद्ध 'जॅमिंग गोट'ला भीषण आग! पर्यटकांच्या लाडक्या शॅकचे मोठे नुकसान

छत्रपतींच्या आदेशानुसार बाजीराव पेशव्यांनी सरदार रामचंद्र सुखटणकर यांच्या सूचनेवरून 'मंगेशी' गाव मंदिराला दान केले..

Goa Salt Pans: 1964 साली गोव्यात 200 हून अधिक मिठागरे होती आणि आज..?

50 वर्षीय आरोपीचा 'मानसिक' बनाव फसला! POCSO न्यायालयाने जामीन फेटाळला; 'IPHB'ची कागदपत्रंही निरुपयोगी

Brahmin History: अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति। ब्राह्मणी उपासना आणि सभ्यता

SCROLL FOR NEXT