Panaji Accident
Panaji Accident Dainik Gomantak
गोवा

Panaji Accident: पणजीत भरधाव टेम्पो विजेच्या खांबाला धडकला

दैनिक गोमन्तक

पणजी येथे दयानंद बांदोडकर मार्गावर कसिनोदरम्यान चार चाकीचा आज अपघात झाला आहे. हा अपघात वेगाने असणाऱ्या चारचाकीच्या मार्गात एक दुचाकीस्वार आल्याने घडला असल्याचं घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी सांगितले.

(Cargo transporter tempo accident at Panaji one injured)

मिळालेल्या माहितीनुसार पणजी शहरातील दयानंद बांदोडकर मार्गावरुन कदंब एसटी स्टँडकडे जात असताना मालवाहतूक करणारा टेम्पो कसिनोदरम्यान आला असता अचानक एक दुचाकीस्वार या मार्गात वेगाने आला. यावेळी भरधाव वेगात असणाऱ्या मालवाहू टेम्पो चालकाने दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी वळवला. मात्र तोलगतच असणाऱ्या विजेरी खांबावर तो आदळल्याने हा अपघात घडला आहे.

टेम्पो पाण्यात कोसळण्यापासून वाचला असला तरी. वेगाने खांबावर आदळला यात टेम्पोचे नुकसान झाले आहे.दुचाकी चालक मात्र पसार झाला. यावेळी कोणतीही जीवीत हानी नाही.

कसिनोदरम्यान थांबणाऱ्या वाहनांना शिस्त लावण्याची गरज

स्थानिकांनी हा अपघात घडल्यानंतर तातडीने पोलिसांना फोन करत घटनेची माहिती दिली. त्याबरोबर कसिनो असणाऱ्या परिसरात प्रामुख्याने कसिनोसाठी येणारे पर्यटक आणि कसिनोच्या मालकीची चारचाकी वाहने मध्यरस्त्यावरच अचानक थांबतात आणि यामूळे मागील वाहने एकमेकांवर आदळण्याची शक्यता वाढते. यावेळी शिस्त पाळली असती तर आज हा अपघात झाला नसता असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिस यंत्रणा सायंकाळनंतर काहीशी कमी होते. याचा फायदा घेत कसिनोसाठी येणारी वाहने अर्ध्या रस्त्यावर थांबवली जाऊन आरामात यातून ग्राहकांना उतरले जाते. यामूळे रस्त्यावरील वाहतूकीला खिळ बसते आणि जेव्हा कसिनो ग्राहक आरामात उतरेल तेव्हा अशी वाहने मार्गस्थ होतात. तसेच काही वाहने अर्ध्या रस्त्यावर लावली जातात. यामूळे वाहतूकीसाठी अडथळा निर्माण होत असल्याचं घटनास्थळी एका नागरिकाने सांगितले.

आज झालेल्या या अपघातात जीवीत हानी झाली नसली तरी दयानंद बांदोडकर मार्गावरील वाहतूक समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास मोठा अपघाताची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामूळे पोलिस प्रशासनाने तातडीने वाहन चालकांना समज देणे गरजेचे असून पुन्हा असा अपघात होणार नाही यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असल्याचं नागरिकांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Vehicle : ई-वाहन खरेदीकडे ग्राहकांची पाठ; दरमहा ८२४ वाहनांची नोंद

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

SSC Result Sanguem : सांगे तालुक्यात सरकारी शाळांची बाजी; दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

Nepal: नेपाळनेही एव्हरेस्ट, MDH मसाल्यावर घातली बंदी; धोकादायक केमिकलबाबत केली कारवाई

SCROLL FOR NEXT