Dussehra Puja 2022: गोव्यात झेंडू फुलांचा 'बहर' लांबणीवर

Dussehra Puja 2022: दसऱ्यासाठी राज्याबाहेरून येणाऱ्या झेंडू फुलांवर अवलंबून राहावे लागणार आहे.
Zendu Flowers | Dussehra Puja 2022
Zendu Flowers | Dussehra Puja 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

Dussehra 2022: डिचोलीत यंदा अडीच हेक्टरहून अधिक जमीन ‘झेंडू’ फुलांच्या लागवडीखाली आली असली, तरी यंदा झेंडू फुलांच्या बहरावर परिणाम झाल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे यंदा दसरोत्सवात डिचोलीत स्थानिक झेंडू फुलांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असून, गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही दसऱ्यासाठी राज्याबाहेरून येणाऱ्या झेंडू फुलांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

त्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्रातील फुलांची आवक वाढणार आहे, असे मत स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. डिचोलीतील काही भागातील झेंडूंचे मळे अजूनही पूर्णपणे बहरलेले नाहीत. असंतुलित पावसामुळे झेंडू फुले बहरण्यावर परिणाम झाला असला, तरी यंदा झेंडू फुलांची रोपटी निकृष्ट दर्जाची उपलब्ध झाल्याने काही मळे फुलांअभावी ओस पडले आहेत.

Zendu Flowers | Dussehra Puja 2022
Mormugao Municipality: योगिता पार्सेकरच्या तर्फे अंगणवाडीतील 85 मुलांना फळांचे वाटप

तशी माहितीही काही शेतकऱ्यांकडून उपलब्ध झाली आहे. दुसऱ्या बाजूने दसऱ्याला थोड्या प्रमाणात तरी बाजारात स्थानिक झेंडू फुले उपलब्ध होणार असल्याचा दावा कृषी खात्याकडून करण्यात आला आहे.

रोपे कमकुवत

यंदा स्थानिक स्वयंसाहाय्य गटांनी रुजवून काढलेली झेंडूची रोपटी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र ही रोपटी कमकुवत आहेत. त्यांची अपेक्षेप्रमाणे वाढ झालेली नाही. त्यामुळे फुले फुलण्याची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे.

Zendu Flowers | Dussehra Puja 2022
Rohan Khaunte: महासागर इंटरप्रिटेशन सेंटरची स्थापना होणार; पर्यटन मंत्र्यांची हमी

दोन वर्षापूर्वी दसरोत्सवात आपल्या मळ्यातून दीडशेहून अधिक किलो झेंडू फुलांची विक्री करण्यात आली होती. गेल्या वर्षी फुलांच्या बहरावर परिणाम झाल्याने यंदा कमी कमी प्रमाणात लागवड केली आहे. यंदाही दसऱ्याला फुले मिळणे मुश्कील झाले आहे, असे शेतकरी महेंद्र पळ यांनी सांगितले.

दिवाळीला फुले उपलब्ध होण्याची आशा

दसरा सण म्हटला, की प्रामुख्याने झेंडू फुलांना प्रचंड मागणी असते. मात्र यंदा दसऱ्याला कृषी खात्याच्या योजनेंतर्गत स्थानिक जमिनीत फुललेली झेंडूची फुले दुर्मीळ होणार आहेत. गेल्यावर्षीही दसरा सणावेळीही झेंडू फुलांच्या बहरावर परिणाम झाला होता. यंदाही तीच स्थिती आहे. आवश्‍यक प्रमाणात ती मिळणार नाहीत. हवामान संतुलित राहिल्यास दिवाळी सणावेळी झेंडूची फुले उपलब्ध होण्याची आशा आहे. तसे संकेतही कृषी खात्याकडून मिळाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com