Gauri Achari Case : खांडोळा महाविद्यालयीन साहाय्यक प्राध्यापक गौरी आचारी हिच्या हत्येप्रकरणी सेलिब्रिटीफिटनेस ट्रेनर संशयित गौरव बिद्रे याच्याविरुद्ध सादर केलेल्या आरोपपत्रावरील सुनावणीला सोमवारपासून सुरुवात झाली. आरोप निश्चितीवरील ही सुनावणी येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत सत्र न्यायालयाने तहकूब केली. पुढील सुनावणीवेळी गौरव ब्रिदे याच्यातर्फे जामिनासाठी अर्ज सादर केला जाणार आहे. सोमवारी 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीवेळी संशयिताला न्यायालयात आणण्यात आले होते.
जुने गोवा पोलिसांनी 20 सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायालयासमोर सादर केलेल्या आरोपपत्रात बिद्रे यांच्यावर कलम 302 (खून), 365 (गुप्तपणे आणि चुकीच्या पद्धतीने बंदिस्त ठेवण्याच्या उद्देशाने एखाद्या व्यक्तीचे अपहरण किंवा अपहरण), 342 (चुकीच्या पद्धतीने बंदिवासात ठेवणे) व कलम 201 (पुरावा नष्ट करणे) खाली आरोप ठेवले आहेत. या 303 पानांच्या आरोपपत्रात 49 जण साक्षीदार आहेत. जुने गोवे पोलिसांनी आणखी काही पुरावे जमा केले आहेत त्याचे पुरवणी आरोपपत्र लवकरच न्यायालयात सादर करणार आहे.
संशयित गौरव बिद्रे (36) याच्यावर खोर्ली येथील निवासी संकुलात उभ्या असलेल्या कारमध्ये गौरी आचारी (35) हिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे आणि त्यानंतर त्याने तिचा मृतदेह कदंब पठार येथील जंगलात फेकून दिला. तिने त्यांच्या मैत्रीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने आरोपी नाराज व वैफल्यग्रस्त झाला होता. तिने त्याच्याशी असलेली मैत्री सोडली होती. तिने त्याच्याशी संपर्कही तोडला होता. त्यामुळे तो संध्याकाळच्या सुमारास गौरी ही राहत असलेल्या इमारतीच्या ठिकाणी उभा होता. या ठिकाणी गौरी गाडीने आल्यावर त्याने तिला थांबवले. त्यांच्यातील सुरू असलेल्या संभाषणाचे रुपांतर वादात झाले व रागाच्या भरात त्याने तिचा गळा आवळला. तिचा मृतदेह तिच्या गाडीतून काढून आपल्या गाडीत घातला व त्यानंतर कदंब पठार येथील जंगलात नेऊन लपवून ठेवला होता.
कुटुंबियानी तिच्या बेपत्ताबाबतची तक्रार पोलिसांना दिल्यावर तपासाची चक्रे वेगाने फिरली व संशयित गौरव बिद्रे याला काही तासातच गजाआड करण्यात आले. त्याने खुनाची कबुली दिली व त्याने ज्या ठिकाणी मृतदेह टाकला होता ती जागा दाखल्यावर मृतदेह ताब्यात पोलिसांनी घेतला होता. त्याने केलेल्या या अमानुष कृत्याबाबत राज्यात संतापाची लाट उसळली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.