Zuari Bridge  Dainik Gomantak
गोवा

झुआरी पुलावरून नदीत पडलेली कार ही लोटली येथील कुटुंबातील असल्याचा संशय

हे वाहन लोटली येथील प्रेसिल्ला डिक्रूझचे असल्याचा दाट संशय आहे

दैनिक गोमन्तक

गोवा: काल मध्यरात्री झुआरी पुलावरून नदीत पडलेली एसयूव्ही बनावटीची गाडी ही लोटली येथील डीक्रूझ कुटुंबातील असल्याचे दिसते, अशी माहिती नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट दिली असता पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. हे वाहन लोटली येथील प्रेसिल्ला डिक्रूझचे असल्याचा दाट संशय आहे, जी काल रात्री आपल्या पतीसोबत बर्थडे पार्टीसाठी जात होती.

(car that fell into the river from the Zuari bridge is suspected to belong to a family from Lotli)

सिक्वेरा म्हणाले की, नदीच्या पात्रातून वाहन आणि प्रवासी बाहेर काढल्यावरच या अधिकृत माहिती पुढे येईल. पोलिस, तटरक्षक दल व नौदलाच्या डायव्हर्सकडून शोध आणि बचाव कार्य सुरू झाले आहे. सर्वजण नदीत बुडालेल्या वाहनाचा शोध घेत असून अजूनही त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.

आमदार सिक्वेरा म्हणाले की, त्यांनी डीक्रूझच्या घरी भेट दिली होती जिथे त्यांना आढळले की हे जोडपे परतलेच नाही. त्यांचा 13 वर्षांचा मुलगा आजोबांसोबत घरी आहे. या वाहनातून चार जण काल रात्री प्रवास करत होते आणि तेव्हापासून ते घरी परतलेच नाहीत. वाहन महिला चालवत होती अशी माहिती पुढे आली आहे.

टॅक्सी चालक - घटनेपूर्वी अपघातग्रस्त वाहनाच्या पुढे असलेल्या एका टॅक्सी चालकाने त्याचा वाहनाच्या साईड आरशामध्ये मागाहून येणारे हे वाहन पाहिले होते. त्याने दिलेल्या माहितीनसार हे वाहन भरधाव वेगात होते व या वाहनाने एका टॅक्सीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता या वाहनाने उजव्या बाजूला असलेल्या पुलाच्या कठड्याला धडक दिली. या धडकेने पुलाचा कठडा मोडून हे वाहन नदीत पडले. या वाहनात कितीजण होते याचा अंदाज लागला नाही.

दक्षिण गोवा वाहतूक पोलिस उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताची माहिती रात्री 1 वाजता आगशी पोलिस स्थानकाला मिळाली तर आपल्याला पोलिस नियंत्रण कक्षाकडून या घटनेची माहिती मिळाल्यावर ताबडतोब तेथे पोहचलो. त्यापूर्वीच आगशी व वेर्णा पोलिस तसेच अग्निशमन दलाचे जवान पोहचले होते. रात्रीपासून शोधकार्य सुरू होते मात्र काळोख असल्याने शोधकार्य सुरू ठेवण्यात अडचणी येत होत्या. दरम्यान तटरक्षक दल व नौदल डायव्हर्शी संपर्क साधण्यात आला होता. हे वाहन लोटली येथून पणजीच्या दिशेने येत होते. या वाहन चालकाने पुलावर ब्रेक मारल्याने त्याच्या खुणा रस्त्यावर दिसत असून ती उजव्या बाजूला वळल्याच्याही खुणा आहेत.

मध्यरात्री पुलाचे रेलिंग तोडून कार झुआरी नदीत कोसळली!

काल मध्यरात्री झुआरी पुलाची बाजूची रेलिंग तुटल्याने एक कार प्रवाशांसह झुआरी नदीत पडल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. अग्निशमन आणि आपत्कालीन कर्मचार्‍यांसह वेर्णा व आगशी पोलिसांकडून झुआरी नदीत शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Beach: मित्रांसोबतची गोवा ट्रिप ठरली अखेरची! 23 वर्षीय हैद्राबादचा तरुण समुद्रात बुडाला; कळंगुटमधील घटना

Pooja Naik: 'हा तर सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न...' पूजा नाईकच्या आरोपांवर काय म्हणाले आमदार मायकल लोबो?

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

SCROLL FOR NEXT