राज्यातील सत्ताधारी भाजप सरकार अनेक पातळ्यांवर अपयशी; अमित पालेकर

काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेपासून दूर अमित पालेकर यांचे वक्तव्य
Amit Palekar
Amit Palekar Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील सत्ताधारी भाजप सरकार अनेक पातळ्यांवर अपयशी ठरल्याने विधानसभेमध्ये त्यांनी अनेक प्रश्नांची दिली नाहीत किंवा उत्तरे टाळली. प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस विरोधकाची भूमिका चोखपणे बजावत नसल्याचा आरोप ‘आप’चे गोवा समन्वयक ॲड. अमित पालेकर यांनी केला. पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार वेंझी व्हिएगस, क्रूझ सिल्वा आणि रामराव वाघ उपस्थित होते.

(ruling BJP government in the state has failed on many levels; Amit Palekar)

Amit Palekar
कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ, जाणुन घ्या पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर

यावेळी पालेकर म्हणाले, विधानसभेचा कार्यकाळ कमी केला असतानाही ‘आप’च्या दोन आमदारांनी सर्वाधिक 306 प्रश्न विचारून ‘आप’ गोमंतकीयांचा आवाज बनला. व्हिएगस यांनी 172 तर आमदार सिल्वा यांनी 134 प्रश्न उपस्थित केले. त्यातील तारांकित प्रश्नांना सरकारने योग्य उत्तरे दिली नाहीत किंवा उत्तरे टाळण्याचा प्रयत्न केला. याबाबत जाब विचारण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. ‘आप’चे आमदार अनेक उपाययोजना सुचवत असताना सत्ताधारी पक्षाकडून अनेकवेळा त्यांची खिल्ली उडवली गेली.

आमदार व्हिएगस म्हणाले, की, जेव्हा ‘आप’चे आमदार सामान्य लोकांचे प्रश्न उपस्थित करत होते, तेव्हा सत्ताधारी पक्षातील काही आमदार ‘आप’च्या आमदारांची थट्टा करण्यात व्यस्त होते.

Amit Palekar
मध्यरात्री पुलाचे रेलिंग तोडून कार झुआरी नदीत कोसळली!

आमदार क्रुझ सिल्वा म्हणाले की, विधानसभेच्या अधिवेशनात पहिल्यांदाच वेळ्ळीच्या लोकांच्या समस्या मांडल्याने त्यांचे मतदारसंघातील लोक खूप समाधानी आहेत. त्यांच्या मतदारसंघातील लोकांनी प्रत्येक सत्राचा पाठपुरावा केला.

आमदार व्हिएगस यांनी अधिवेशनात आरोग्य, शिक्षण आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवर भर दिला. यासोबत बजेटमध्ये 25 टक्के शिक्षणासाठी तरतूद करण्याचे आवाहनही केले. त्यांनी गोव्याला ‘वर्केशन डेस्टिनेशन’ ठिकाण बनवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणी केली. सरकारने कोमुनिदाद कायद्यात सुधारणा करण्याचीही विनंती त्यांनी यावेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com