Goa Accident Case Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात शाळकरी मुलाला कारने उडवलं

बसची वाट पाहताना भरधाव कारची मुलाला धडक

दैनिक गोमन्तक

फोंडा: खांडेपारहून उसगावकडे जाणाऱ्या एका कारने शनिवारी सकाळी बसची वाट पाहत असताना धडक दिल्याने दहा वर्षीय शाळकरी मुलगा जखमी झाला. दरम्यान या घटनेनंतर, स्थानिकांनी हा परिसर अपघात प्रवण क्षेत्र आहे हे माहीत असूनही ओपा जंक्शनवर बसशेड बांधले नसल्याबद्दल पंचायत आणि सरकारला दोष दिला. (car hits a 10 year old child waiting for the bus In Goa)

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंतित असलेल्या खांडेपार स्थानिक व शाळा पालक शिक्षक संघटनेच्या सदस्यांनी काही दिवसांपूर्वी या धोकादायक ओपा जंक्शनवर तातडीने बसशेडची मागणी केली होती. बसशेड परिसरात काही विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याचा दावा स्थानिक संदीप पारकर यांनी केला.

विद्यार्थ्यांच्या (Goa Student) सुरक्षेसाठी पंचायतीने काम केले पाहिजे. चार महिन्यांपूर्वी ओपा जंक्शन येथे एका हॉटेलवर ट्रक घुसल्याने संपूर्ण हॉटेलचे नुकसान झाल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या दरम्यान तिथ उपस्थित विद्यार्थी आणि काही स्थानिक, जे बसची वाट पाहत होते, ते भाग्यवान म्हणुन बचावले अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली.

"सुमारे 15 दिवसांपूर्वी, पालकांनी ओपा जंक्शनवर बस शेडची मागणी केली होती कारण शेकडो विद्यार्थी अरुंद रस्त्याच्या कडेला बसची वाट पाहत उभे असतात.

ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) चार पदरी पूल बांधला आणि तीन वर्षांपूर्वी त्याचे उद्घाटन केले असले तरी, त्याचा फोंडा (Ponda) बाजूकडे जाणारा रॅम्प/रस्ता (Road) आजपर्यंत पूर्ण झालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT