गोव्यातील अमली पदार्थांच्या तस्करीचा महाराष्ट्रातून लागला सुगावा

यापूर्वी 6 फेब्रुवारी रोजी एका प्रकरणात 3.5 किलो गांजासह केली होती अटक
NCB arrested a drug smuggler in goa
NCB arrested a drug smuggler in goaDainik Gomantak

पणजी: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने एका अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे, यापूर्वी या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राजस्थानमधील बाळाराम उर्फ बाला असे आरोपीचे नाव असून त्याला शुक्रवारी सायंकाळी 10 किलो गांजासह रंगेहात पकडण्यात आले. महाराष्ट्रातील (Maharashtra) शिरपूर येथून त्याचा माग काढल्यानंतर म्हापसा (Mapusa) येथे छापा टाकण्यात आला.

NCB arrested a drug smuggler in goa
मयेतील माया केळबाय देवस्थानची निवडणूक घेण्यास विरोधकांची हरकत

“गोव्यात (Goa) रिसिव्हरची ओळख पटवण्यासाठी आणि पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यापूर्वी बलरामला NCB ने 6 फेब्रुवारी रोजी एका प्रकरणात 3.5 किलो गांजासह अटक केली होती. दरम्यान 25 फेब्रुवारी रोजी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली,” असे एका संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले.

अंमली पदार्थांचा व्यवहार आता केवळ किनारपट्टी (Goa Beach) भागापुरता मर्यादित न राहता तो शहरांबरोबरच ग्रामीण भागातही पोचला आहे. फोंडा पोलिस (Ponda Police) स्थानकाच्या हद्दीत गेल्या दोन वर्षांत सातपेक्षा जास्त छापे टाकण्यात आले असून त्यातून गांजा व इतर प्रकारचे अंमलीपदार्थ ताब्यात घेण्यात आला आहेत.(NCB arrested a drug smuggler in goa)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com