Burning Car in Mapusa Dainik Gomantak
गोवा

Burning Car: म्हापशात उड्डाणपुलावर कार आगीत जळून खाक; बघता बघता लाखोंचे नुकसान, पहाटेची घटना

सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दैनिक गोमन्तक

Burning Car in Mapusa: आज (02 जुलै) पहाटे करासवाडा, म्हापसा येथील उड्डाणपुलावर एका कारला भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. यामध्ये कार पूर्ण जाळून खाक झाली असल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.

संपूर्ण माहिती अशी की, कोलवाळच्या दिशेने चाललेल्या GA03H.9405 फोर्ड फिगो कारला पुलावर असताना अचानक आग लागली. आग इतकी भीषण होती की थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसेना. यानंतर अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.

या घटनेत जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले असून तीस हजारांपर्यंतचे नुकसान वाचवण्यात यश आले असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मात्र आग लागण्यामागील नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT