Goa Beach
Goa Beach Dainik Gomantak
गोवा

Goa Beach: समुद्राच्‍या पाण्‍यात पुन्‍हा अडकली कार!

दैनिक गोमन्तक

Goa Beach: गोवा हे जागतिक पर्यटनस्‍थळ (Tourist Spot) आहे. त्‍यामुळे दरवर्षी येथे लाखो देशी-विदेशी पर्यटक येतात. जीवाचा गोवा करून ते निघून जातात. पण काही पर्यटक दारूच्‍या नशेत मस्‍ती करतात. त्‍यांच्‍या उद्दामपणापुढे स्‍थानिक ग्रामस्‍थच नव्‍हेत तर सरकारी यंत्रणांचीही तारांबळ उडते. काही दिवसांपूर्वी दारूच्‍या नशेत समुद्राच्‍या पाण्‍यात गाडी नेण्‍याचा व्‍हिडिओ व्‍हायरल झाला होता. सुदैवाने अनर्थ टळला होता. कालही तसाच प्रकार घडला.

महाराष्‍ट्रात नोंदणी झालेली एक कार भरधाव वेगाने मोरजी किनारी भागात हाकताना समुद्राच्‍या पाण्‍यात रुतली. याला फक्त पर्यटकांची मस्‍तीच म्‍हटले तर वावगे ठरणार नाही. अलीकडच्‍या काळात पावसाळ्‍यातही गोव्‍यात पर्यटकांची संख्‍या वाढली आहे.

गोव्यात येऊन भाडपट्टीवर किंवा स्वतःचे वाहन बेशिस्तीने चालवण्याची जणू पर्यटकांना सवयच झाली आहे. राज्यात पर्यटकांकडून अपघात होत असून, समुद्रकिनाऱ्यांवर वाहन घेऊन जाण्याचे प्रकारही वाढत आहेत. असाच एक प्रकार अलीकडेच उत्तर गोव्यातील वागातोर (Vagator) समुद्रकिनाऱ्यावर घडला होता. दिल्लीतून आलेले पर्यटक गाडी घेऊन किनाऱ्यावर फिरत होते.

जीवाचा गोवा करण्यासाठी आलेल्या राधानगरी (कोल्हापूर) येथील सागर बापू सर्वटकरने चारचाकी थेट मोरजी किनाऱ्यावर नेली. त्याच्यासोबम महिला लहान मुले होती. पेडणे पोलिसांनी वाहन मालकावर भारतीय दंड सहिता कलम 279, 336 या कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT