Road Development Work | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Verna: वेर्णा येथील जुन्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण रद्द; सुरक्षा व्यवस्थापन समिती बैठकीत निर्णय

Verna Old Highway: दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा व वाहतूक व्यवस्थापन समितीची बैठक झाली व या बैठकीत वेर्णा येथील रस्त्याचे रुंदीकरण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

Verna Old Highway Road Widening Work Cancelled

सासष्टी: वेर्णा येथील जुन्या राष्ट्रीय महामार्गाचे आग्नेल आश्रम ते होंडा शोरुम पर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव होता. मात्र, त्याला स्थानिकांचा विरोध होता. रुंदीकरणामुळे अनेक घरांना बाधा येण्याची शक्यता होती.

आज दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा व वाहतूक व्यवस्थापन समितीची बैठक झाली व या बैठकीत या रस्त्याचे रुंदीकरण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही माहिती दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी पत्रकारांना दिली.

या जुन्या राष्ट्रीय महामार्गाच्या समांतर यापूर्वीच नवा पश्र्चिम बगल रस्ता बांधण्यात आलेला आहे. सर्व वाहतूक त्या रस्त्यावरुन वळविण्यात आली आहे. या नव्या रस्त्यावर जो उड्डाण पूल बांधण्यात आला आहे, तोही या महिन्यात वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. अशा परिस्थितीत वेर्णा येथील जुन्या रस्त्याचे रुंदीकरणाचा प्रश्नच उद्‍भवत नसल्याचे सांगून या कामामुळे सरकारचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत, असेही ते म्हणाले.

आजच्या बैठकीत अनेक चांगले निर्णय घेण्यात आले. दांडेवाडो, चिंचोणे येथे सुद्धा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. या पूर्वी या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तीन प्रस्ताव देण्यात आले होते. मात्र, अधिकऱ्यांनी ते फेटाळून त्यांना हवे तसे रस्त्याचे डिझाईन तयार केले आहे. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पुनर्संरेखन करावे,अशी मागणी या बैठकीत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

गोवा कॅनचे निमंत्रक रोलांड मार्टिन्स यांनी बनावट हेल्मेट रस्त्यावर विकतात, हा मुद्दा उपस्थित केला. गोव्यात दोन्ही जिल्ह्यात ब्युरो इंडियन स्टॅण्डर्डची कार्यालये सुरू करण्यास प्राधान्य देण्याचे बैठकीत ठरले. बैठकीला दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एगना ट्लेटस व दक्षिण गोव्याच्या पोलिस अधिक्षक सुनिता सावंत व विविध सरकारी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

योजनांबाबत जनजागृतीचा निर्णय

रस्ते अपघातांसंदर्भात सरकारच्या अनेक योजना आहेत. मात्र, लोकांना त्या माहीत नाहीत. या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जागृती मोहीम हातात घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जर अपघातग्रस्ताला मदत केली, त्याला इस्पितळात पोहोचविले तर ५ हजार रुपयांचा पुरस्कार देण्याची योजना आहे. शिवाय एखाद्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना विम्याच्या रुपाने २.५ लाख रुपये पर्यंत देण्याची योजना आहे, असेही खासदार विरियातो फर्नांडिस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'त्या' वर्तणुकीची जबाबदारी आमदाराची कशी? सरदेसाईंनी माफी मागण्यास दिला नकार; कोळसा मुद्द्यावरुन काब्रालही आक्रमक

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT