Quepem Goa News Dainik Gomantak
गोवा

Quepem Goa News : जलप्रकल्पाआडून मिराबागमध्ये पर्यटनस्थळ नकोच! ग्रामस्थांचा विरोध

Quepem Goa News : नदीवर बंधारा आणि जॉगिंग ट्रॅकसाठी २८० कोटींची निविदा

गोमन्तक डिजिटल टीम

Quepem Goa News

मिराबाग-सावर्डे येथे जलप्रकल्पाच्या आडून पर्यटन स्थळ विकसित करण्याचा सरकारचा डाव आहे. आम्ही हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असे सांगत मिराबाग-सावर्डे येथील बैठकीत प्रस्तावित ३० एमएलडी जलप्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला.

मिराबाग येथे राज्यरुपयांची निविदा जारी केल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आज सकाळी मिराबाग-सावर्डे येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ही बैठक झाली. यावेळी सावर्डेचे आमदार गणेश गावकर, कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल, सावर्डेच्या सरपंच चिन्मयी नाईक, कुडचडेचे नगराध्यक्ष प्रदीप नाईक,

पंच शशिकांत नाईक, बाबू सावंत, नितेश भंडारी, नगरसेवक टोनी फर्नांडिस जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सरकारने झुआरी नदीवर बंधारा तसेच जॉगिंग ट्रॅकसाठी २८० कोटी

मी या बैठकीला उपस्थित होतो. जर लोकांना हा प्रकल्प नको असेल तर मी लोकांसोबत असेन. हा प्रकल्प मिराबाग, माडेल, धडे या गावातील लोकांसाठी धोकादायक ठरणार असे दिसून आल्यास लोक जे सांगतील तसे मी करीन. - गणेश गावकर, आमदार, सावर्डे.

शेती-बागायतीला पुराचा धोका

मिराबाग-सावर्डे येथे झुआरी नदीचे पात्र इंग्रजी अक्षर ‘यू’ आकाराचे असल्याने या गावाला या नदीने तिन्ही बाजूंनी वेढले आहे. पावसाळ्यात बऱ्याचदा नदीला पूर येऊन गावातील शेतजमिनी व बागायती पाण्याखाली जातात आणि लोकांचे मोठे नुकसान होते. या नदीवर बंधारा बांधला तर पुरामुळे संपूर्ण गाव पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

समाधानकारक उत्तरे नाहीत :

ग्रामस्थ सुमित नाईक म्हणाले की, आम्ही जलस्रोत अभियंत्यांना प्रश्न विचारले; पण त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेताच सरकारने हा प्रकल्प आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला असून तो मान्य नाही. पिण्याच्या पाण्याचा मुद्दा उपस्थित करून याठिकाणी पर्यटन स्थळ विकसित करण्याचा विचार असून याचा कोणताच फायदा ग्रामस्थांना नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT