St. Inez Panjim Dainik Gomantak
गोवा

Smart City Panaji: नेमकं चाललंय तरी काय? स्मार्ट सिटी पणजीत पुन्हा सापडले गांजाचे रोप

Cannabis Plant Found In Panaji: स्मार्ट सिटीत पुन्हा एकदा गांजाचे रोप सापडल्याने गोंधळ उडाला आहे. जुन्या उत्पादन शुल्क मुख्यालयाजवळील परिसरात हे रोप सापडले.

Manish Jadhav

पणजी: स्मार्ट सिटीत पुन्हा एकदा गांजाचे रोप सापडल्याने गोंधळ उडाला आहे. जुन्या उत्पादन शुल्क मुख्यालयाजवळील परिसरात हे रोप सापडले. यासंबंधीची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी हे रोप पंचनामा करुन ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वी, काकुलो मॉल परिसरात असेच गांजाचे रोप सापडले होते. त्यानंतर अमलीपदार्थ विरोधी पथकाने पूर्ण तपास करुन ते रोप गांजाचेच असल्याचे म्हटले होते. आता पुन्हा एकदा पणजी शहरात अशीच घटना घडली आहे.

दरम्यान, सापडलेले हे अमली पदार्थाचे रोप पोलिसांनी ताब्यात घेतले असताना आता पुन्हा हा प्रकार कसा काय घडला असा सवाल उपस्थित होत आहे. गांजाच्या या रोपांच्या बिया नेमके कोण आणून टाकते किंवा कधीपासून आणून टाकते असा सवालही उपस्थित केला जात आहे.

काही दिवसांपूर्वी पत्रकारांनी पणजीचे (Panaji) आमदार बाबूश यांच्याकडे पणजीत सलग दोनवेळा घडलेल्या या विचित्र प्रकाराबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर बाबूश म्हणाले होते की , "मी ती झाडं लावली आहेत का?, ती झाडं कोणी लावली हे शोधून काढा. मीच अशा प्रकारांना प्रोत्साहन देत असल्याप्रमाणे तुम्ही प्रश्न विचारात आहात."

तसेच, 6 जानेवारी रोजी संतीनेज परिसरात शीतल हॉटेल ते मधुबन जंक्शन रस्त्यावर असलेल्या झरीना टॉवरजवळ गांजाचे रोप सापडले होते. अंमली पदार्थ विरोधी पथकाने या रोपाचे परीक्षण करुन ते गांजाचेच असल्याचे सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT