Father Killed Children in Candolim | Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

Candolim Murder Case: दोन मुलांचा खून करून बापाने केली आत्‍महत्‍या

Candolim: ओर्डा-कांदोळी येथे शनिवारी रात्री उशिरा याबाबतची माहिती उघडकीस आली. या हत्‍याकांडामुळे संपूर्ण गोवा हादरून गेला आहे.

दैनिक गोमन्तक

Candolim Murder Case: कांदोळी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पित्याने पोटच्या दोन मुलांचा गळा आवळून खून करत स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ओर्डा-कांदोळी येथे शनिवारी रात्री उशिरा याबाबतची माहिती उघडकीस आली. या हत्‍याकांडामुळे संपूर्ण गोवा हादरून गेला आहे.

जॉय फर्नांडिस असे हत्या केलेल्या बापाचे नाव आहे. तर मुलगी अनानिया (13) आणि मुलगा जोसेफ (8) अशी मुलांची नावे आहेत. जॉय हा अनेक वर्षांपासून बेरोजगार होता. तसेच तियात्र कलेशी निगडित होता. मोठी मुलगी अनानिया ही दोनापावला येथील एका नामांकित हायस्कूलमध्ये, तर जोसेफ हा पर्वरी येथील खासगी शिशुवाटिकेत शिकत होता.

जॉयची पत्नी इर्निया शिक्षिका म्‍हणून कार्यरत आहे.

शनिवारी दुपारी इर्निया दुपारी दोनच्या सुमारास शाळेतून घरी परतली. यावेळी दोन्ही मुले आणि पती घरीच होते. इर्नियाला एका विवाह समारंभात जायचे असल्याने तासाभरातच मुलांसह पतीचा निरोप घेत ती घराबाहेर पडली. परंतु घरी परतल्यानंतर काही वेळाने हा प्रकार लक्षात येताच तिला प्रचंड मोठा धक्‍का बसला.

जॉय फर्नांडिस त्रियात्र कलाकार

जॉय हा तियात्र कलेशी निगडित होता. ख्रिस्ती समाजात तो परिचित होता. कळंगुटचे माजी आमदार तोमाझीन कार्दोज यांच्या कार्यकाळात कला अकादमी पुरस्कृत तियात्र अकादमीवरही जॉयने पाच वर्षे काम केले होते. गावातील चर्च संघटना तसेच एका राष्ट्रीय पक्षाच्या कळंगुट गट समितीवरही तो बराच काळ सक्रिय होता.

संपत्ती हडपण्याची भीती!

जॉय हा एकेकाळचा नामवंत तियात्रिस्त होता. तसेच त्याच्या मालकीची ओर्डा-कांदोळी तसेच बागा-कळंगुटात स्वत:च्या मालकीची दोन घरे होती‌. मात्र, त्याच्या संपत्तीवर कुणातरी तिसऱ्याची नजर होती, असा त्याला संशय होता.

त्यामुळेच आपल्या संपत्तीचे संरक्षण करण्यासाठीच आठवडाभरापूर्वी जॉयने मालमत्तेची कागदपत्रे भावाच्या मुलांकडे सोपविली होती, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून समजली.

का केला घात? नेमके कारण अस्पष्ट

शनिवारी दुपारी पत्नी बाहेर गेल्यावर जॉयने कॉटवर झोपी गेलेल्‍या पोटच्या मुलांचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळला. मुले गतप्राण होताच, त्याच दोरीच्या आधाराने त्‍याने घरामागील झाडाला गळफास घेत स्वत:ही मृत्यूला कवटाळले. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही. परंतु घरगुती वादातून हे टोकाचे पाऊल उचलले गेले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे.

नवरा-बायकोत तंटे : घटनेनंतर पोलिसांनी चौकशीची सुत्रे जॉयची पत्नी इर्तिया परैरा ई फर्नांडिस हिच्याकडे वळवली आहेत. शेजाऱ्यांनी सांगितले की, जॉय हा बेरोजगार असल्याने नवरा-बायकोत अनेकदा वाद निर्माण होत होते. कदाचित याच रागातून जॉयने हे कृत्य केले असावे, अशी चर्चा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मीन राशीला शनीचा दणका! 40 दिवस 'अस्त', 138 दिवस 'वक्री' राहून कोणत्या राशींचे उघडले भाग्याचे दरवाजे?

गोव्यात निवडणुकीच्या तयारीला वेग! 91 टक्क्यांहून अधिक मतदारांची गणना पूर्ण; सीईओ संजय गोयल यांचा खुलासा

'शार्क टँक'ची Namita Thapar गोव्यात! ''12 तासांच्या शूटिंगमधून सुटका'' म्हणत शेअर केले फोटोज; व्हेकेशन लूक होतोय Viral

Goa voters missing: गोव्यातील एक लाख 78 हजार मतदार गहाळ; 10 लाख 84 हजार 956 मतदारांची नोंद

Illegal club Goa: वागातोरमधील प्रसिद्ध 'कॅफे CO2' चे शटर डाऊन! 250 आसनक्षमतेचा क्लब बेकायदेशीर

SCROLL FOR NEXT