Goa Parking Fee Controversy Dainik Gomantak
गोवा

Goa Bike Parking: गोव्यात दुचाकी पार्किंगसाठी तब्बल 50 रुपये? 'शून्य गुंतवणूक, दुप्पट नफा', नेटकऱ्यांची सोशल मीडियावर पोस्ट

Candolin Pay and Park Charges: कांदोळी समुद्रकिनाऱ्याजवळ पे अँड पार्कमध्ये दुचाकीसाठी 50 रुपये आकारल्याने पर्यटकाने संताप व्यक्त केला आहे.

Pramod Yadav

Candolim Bike Parking Viral Post

कांदोळी: गोव्यात दुचाकी पार्क करण्यासाठी तब्बल पन्नास रुपये मोजावे लागत असल्याची एक पोस्ट रेडिट या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर चर्चेचा विषय ठरली आहे. उत्तर गोव्यातील प्रसिद्ध कांदोळी समुद्रकिनाऱ्याजवळील सिकेरी येथे पंचायतीने आकारलेल्या पार्किंग फी ची पावती शेअर करण्यात आली आहे. यावरुन नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Reddit Goa वरील पोस्ट काय आहे?

गोवा सबरेडिटवर गोव्यातील विविध मुद्दे आणि विषयांवर नेटकरी भाष्य करतात. एका नेटकऱ्याने कांदोळीतील सिकेरीत पे पार्किंगचा मुद्दा उपस्थित केला आहे. नेटकऱ्याने दुचाकी पार्किंगसाठी तब्बल ५० रुपये मोजल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

त्याने कांदोळी पंचायतीने पार्किंगची दिलेले पावती देखील पोस्टसोबत शेअर केलीय. शेअर करण्यात आलेल्या पावतीवरील माहितीनुसार, सिकेरी बस स्थानक ते ताज हॉटेल असा वाहनतळाचा पत्ता देण्यात आलाय. पावतीवर कांदोळी पंचायत असे ठळक अक्षरात लिहले आहे.

नेटकऱ्याने शेअर केलेली पावती ०८ फेब्रुवारची असून, पे पार्किंग ही डबल इंजिन सरकारकडून सुरु असलेली लूट आहे, असे मत त्याने पोस्टमधून व्यक्त केले आहे. तसेच, माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरावा, अशी विनंती देखील त्याने पोस्टमधून केली आहे. या पोस्टवर अनेकांनी विविध मतं मांडली आहेत. तर, काही जणांनी सरकारच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवले आहे.

नेटकरी काय म्हणाले?

'दुचाकी पार्क करण्यासाठी पन्नास रुपये घेतले आणि पावती वाहन मालकाच्या जबाबदारीवर पार्क करावे, अशी सूचना देण्यात आलीय. मग, पे पार्किंगचा काय फायदा?', असा सवाल एका नेटकऱ्याने उपस्थित केला आहे. यावर मत व्यक्त करताना दुसऱ्या एकाने हा प्रकार तर सर्वत्रच पाहायला मिळतो असं म्हटलंय. मोठ्या मॉल्समध्ये अशीच अवस्था आहे, असं त्यानं म्हटलं.

Comments On Reddit Post

आणखी एकाने यावर मंत मांडताना, 'चढ्या दराबाबत पंचायतीला जबाबदार धरले पाहिजे', असं म्हटलं आहे. तर, दुसऱ्या एकाने, 'पावतीवर पावती क्रमांक नाही, जीएसटी नंबर नाही, वरती पासून खालीपर्यंत सर्वांनाच यात लाभ मिळतो. दुर्दैवाने गोव्यात याबाबत कोण आवाज उठवत नाही. माध्यमं देखील या महत्व देत नाहीत. मला असं वाटतं की चारचाकीसाठी तिथं १०० रुपये आकारले जातात', असे मतं त्याने मांडलं आहे.

"स्थानिक आमदाराला निवडून आणण्यासाठी मदत केली जातेय. याचा हिशोब ठेवला जात नाही. पार्किंग आकारणीतून मिळालेले पैसे ना जमीन मालकाला मिळतात ना राज्याला. हा प्रकार गोव्यातच नव्हे सर्वच पर्यटन ठिकाणांवर सुरु आहे", अशी प्रतिक्रिया आणखी एकाने दिली आहे.

Comments On Reddit Post

पर्यटकांवर लगाम लावण्यासाठी शुल्कवाढ?

एका युजरने असाही दावा केला की पर्यटकांनी त्या परिसरात येऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने पैसे वाढवले असतील. गोव्यातील लुटमारीवरून संताप व्यक्त करणाऱ्या युजर्सनाही एकाने प्रत्युत्तर दिले. 'गोवा हे राज्य वाईट नाही. तिथे चांगली लोकही राहतात. मी स्वत: बऱ्याचदा गोव्यात फिरायला गेलोय. काही लोक पैसे कमावतात, पण गोव्यातली सगळीचं लोक तशी नाही' याकडेही त्याने लक्ष वेधले आहे.

Comments On Reddit Post

कांदोळीत दुचाकी पार्किंगचे शुल्क 50 रुपये का?

कांदोळी ग्रामपंचायतीने 2018-19 पासून पे अँड पार्क सुरू केले आहे. बीचजवळ होणारी वाहतूक कोंडी, कचरा यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने ही सुविधा सुरू केली होती. यात 50 रुपये हे पार्किंगची जागा, समुद्र किनारा परिसराची साफसफाई यासाठी आकारले जातील, असं ग्रामपंचायतीच्या निर्णयात म्हटले होते. डिसेंबर 2018 मध्ये टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT