Banastarim Bridge Accident  Dainik Gomantak
गोवा

Banastarim Bridge Accident: न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही!

नागरिकांचा सरकारला इशारा : बाणस्तारी अपघात पीडितांसाठी मेणबत्ती मोर्चा

दैनिक गोमन्तक

Banastarim Bridge Accident: बाणस्तारी येथील भीषण अपघातातील मृत दांपत्य सुरेश आणि भावना फडते, युवक अनुप करमाकर तसेच जखमी शंकर हळर्णकर, वनिता भंडारी आणि राज माजगावकर यांना न्याय देण्याची मागणी करीत स्वातंत्र्यदिनी सायंकाळी जुने गोवा येथील गांधी सर्कल येथे मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला.

जोपर्यंत न्याय होणार नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा नागरिकांनी सरकारला दिला.

यावेळी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई तसेच सामाजिक कार्यकर्ते, पंच आणि जुने गोवा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी केलेला तपास हा, संशयित दांपत्य परेश आणि मेघना सावर्डेकर यांना वाचवण्यासाठी केला गेला आहे.

पुरावे असूनही म्हार्दोळ पोलिसांनी तपास योग्य प्रकारे केला नाही, असे समोर आले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे अन्वेषण शाखा किंवा सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी आमदार फळदेसाई यांनी केली.

पीडित कुटुंबांना 50 लाख द्या

यावेळी नागरिकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मृत आणि जखमींच्या कुटुंबांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी.

त्यांचा काहीही दोष नसताना कुटुंबीयांना याचा त्रास सोसावा लागत आहे. दुसरीकडे मद्यधुंद दांपत्य परेश आणि मेघना सावर्डेकर यांना पोलिस आणि खासकरून सरकार पाठीशी का घालण्याचा प्रयत्न करीत आहे, असा प्रश्‍नही काही नागरिकांनी उपस्थित केला.

सीसीटीव्ही फुटेज तपासावे

पोलिसांनी फोंडा येथील नंदनवन जेथे पार्टी झाली होती, तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहण्याची गरज आहे. अपघाताला आता दहा दिवस उलटले आहेत, त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज जाण्यापूर्वी हे होणे गरजेचे आहे.

तसेच नंदनवन ते बाणस्तारी येथील रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासून पाहण्याची गरज आहे. ही मूलभूत प्रक्रिया पोलिसांनी केली नाही, तर पूर्वीच पोलिस आणि सरकारची संशयास्पद भूमिका, आरोपींना वाचवण्यासाठी काम करत असल्यावर शिकामोर्तब होणार आहे, असे नागरिकांनी बजावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jantar Mantar Student Protest: जंतर मंतर छू:मंतर; गांधीवादी मार्गाने जिंकला जंतर-मंतरवरील लढा

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

खरी कुजबूज: काँग्रेस विचार बदलणार?

Goa Water Issue: तीन महिन्यांतून एकदा वॉटर मीटर तपासणी सक्तीची! गोवा मानवाधिकार आयोगाचे PWD आणि आरोग्य खात्याला कडक निर्देश

Mapusa Traffic Police: म्हापशाच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅमला बसणार ब्रेक! 'वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवा!' उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

SCROLL FOR NEXT