Cuncolim Industrial Estate Dainik Gomantak
गोवा

Cuncolim Industrial Estate: प्रदूषणाविरुद्ध कुंकळ्ळीत ‘कँडल मार्च’

Cuncolim Industrial Estate: नेत्यांची कठोर कारवाईची हाक: न्यायासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन

दैनिक गोमन्तक

Cuncolim Industrial Estate: वर्षांपासून कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील जवळपास गेल्या वीस प्रदूषण करणाऱ्या प्रदूषणकारी कारखान्यातून होणाऱ्या प्राणघातक प्रदूषणाविरुद्ध कुंकळ्ळीकर गेल्या वीस वर्षांपासून प्रदीर्घ लढा देत आहेत.

हा मुद्दा राष्ट्रीय हरित लवादाकडे गेला, सर्वोच्च न्यायालयात पोहोचला, गोवा विधानसभेत या मुद्द्यावर चर्चा झाली, प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रांमध्ये वेळोवेळी हा मुद्दा मांडला गेला आणि प्रदूषणाविरुद्ध लढण्यासाठी कुंकळ्ळीकरही रस्त्यावर उतरले. मात्र, याचा कोणताही सकारात्मक परिणाम प्रदूषणावर झालेला नसून आजही कुंकळ्ळीकर प्रदूषण सहन करीत आहेत.

कुंकळळी औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या प्रदूषणाच्या निषेधार्थ शनिवारी काही स्थानिकांनी ‘कँडल मार्च’ काढला. विरोधी पक्षनेते आणि स्थानिक आमदार युरी आलेमाव, केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा, डॉ. जोर्सन फर्नांडिस, निवृत्त पोलिस अधीक्षक टोनी फर्नांडिस यांनी ‘कँडल मार्च’ला संबोधित केले आणि प्रदूषणाच्या विरोधात कठोर कारवाईची हाक दिली.

राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते या विषयावर रस्त्यावर उतरण्याची ही पहिलीच वेळ नाही. प्रदूषणाच्या विरोधात अशाप्रकारची शेकडो आंदोलने यापूर्वी झाली होती, परंतु परिणाम शून्य. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषण अजूनही जोरात सुरू आहे. त्यामुळे स्थानिक लोक प्रदूषणाच्या मुद्यावर अधिक आशावादी नाहीत.

आता कुंकळ्ळीत सुरू झालेल्या प्रदूषणविरोधी आंदोलनाच्या यशाबद्दल लोकांच्या मनात शंका आहे. प्रदूषणाविरुद्ध लढण्यासाठी स्थानिकांत एकवाक्यता नसल्याचे दिसून येते. काही गटांना मूळ मुद्यावर लढण्यापेक्षा श्रेय घेण्यात अधिक रस असल्याचा आरोपही यावेळी काहीजणांनी केला.

...तर असहकार आंदोलन सुरू करावे

मेणबत्ती मोर्चात सामील झालेल्या स्थानिकांना संबोधित करताना काँग्रेसचे आमदार एल्टन डिकोस्टा यांनी कुंकळ्ळीकरांनी १५८३ मध्ये पोर्तुगालच्या राजवटीविरुद्ध सुरू केलेल्या असहकार आंदोलनाची आठवण करून दिली.

जर सरकार तक्रार ऐकत नसेल, तर असहकार आंदोलन सुरू करावे आणि पंधरा दिवसात प्रदूषण रोखण्यात सरकार अपयशी ठरल्यास पाणी आणि वीज बिले भरणे बंद करा, असे आवाहन आमदार एल्टन डिकोस्टा यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

SCROLL FOR NEXT