Mhadei River Issue: गोवा भाजपला ‘म्हादई’वरून राजकारण थांबवण्यास सांगा

Mhadei River Issue: सिद्धरमय्या यांची विरोधी आमदारांना सूचना
Mhadei River Issue
Mhadei River IssueDainik Gomantak
Published on
Updated on

Mhadei River Issue: म्हादई नदीचे पाणी वळविण्यासाठी आवश्‍यक असणारा पर्यावरणीय मंजुरी दाखला केंद्रातील भाजप सरकार देत नाही. म्हादईच्या पाणी वळविण्यावरून राजकारण करू नये, असे गोवा सरकारला सांगावे, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी विधानसभेत विरोधी पक्षातील भाजपा आमदारांना सांगितले.

Mhadei River Issue
Minister Vishwajeet Rane: सर्व घटकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणे आवश्‍यक!

कर्नाटकचे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. म्हादई नदीचे पाणी वळविण्यासाठी कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सत्तेवर येताच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात एक हजार कोटींची आर्थिक तरतूद केली आहे.

त्याशिवाय राज्यात सरकार सत्तेवर येताच हा प्रकल्पही मार्गी लागेल, असे आश्‍वासन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने कर्नाटकातील जनतेला दिले आहे. परंतु केंद्रात भाजप सरकार असल्याने ते कर्नाटकला पर्यावरणीय मंजुरी काही देत नाही. पर्यावरणीय मंजुरी मिळताच राहिलेले म्हादईचे पाणी वळविण्याचे काम पूर्णत्वास नेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

कर्नाटक विधानसभेच्या कामकाजावेळी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी म्हादईच्या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे. गोव्यातही म्हादईचा कळीचा मुद्दा बनलेला आहे. एका बाजूला गोव्याची न्यायालयीन लढाई सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला राजकीय पटलावर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात राजकीय नेते व्यस्त आहेत.

कर्नाटक सरकारला केंद्रात भाजप सरकार असेपर्यंत तरी पर्यावरणीय मंजुरी मिळण्याची शक्यता फार कमी वाटतेय, परंतु सर्वोच्च न्यायालय कोणाच्या बाजूने निकाल देतेय, यावरच म्हादईच्या पाण्याचा प्रश्‍न टिकून आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com