Goa Loksabha Congress
Goa Loksabha Congress Dainik Gomanatk
गोवा

Goa Congress Internal Politics: काँग्रेसपक्षात सुंदोपसुंदी, उमेदवार ठरेनात

दैनिक गोमन्तक

Goa Congress Internal Politics

काँग्रेसमध्ये सध्या उमेदवारी कोणाला मिळू शकते, याविषयीही स्पष्टता नसल्याने कोणीच प्रचार सुरू करू शकत नाही, अशी स्थिती आहे. तरीही काहीजणांनी ऐनवेळी धावाधाव करायला नको म्हणून मला उमेदवारी मिळाली तर पाठिंबा द्या, असे आपल्याशी संबंधित लोकांना सांगणे सुरू केले आहे.

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप, प्रदेश सरचिटणीस विजय भिके यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता प्रदेश उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

उमेदवारीसाठी अर्ज केला आहे की नाही, हे सांगण्यास कवठणकर यांनी नकार दिला आहे. निवडणूक लढवण्यास इच्छूक आहे की नाही याबाबत जेव्हा निर्णय होईल तेव्हा पाहू, असे सांगत त्यांनी उत्सुकता वाढवली आहे.

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे फ्रासिस सार्दिन सध्या खासदार आहेत. त्यांनाच उमेदवारी देणार की, नव्या चेहऱ्याचा विचार करणार याबाबत कॉंग्रेसमध्ये स्पष्टता नाही. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य गिरीश चोडणकर हेही उमेदवारीसाठी इच्छूक असल्याची चर्चा आहे.

या साऱ्यात माजी सनदी अधिकारी एल्विस गोम्स यांचे नाव मात्र कुठेही ऐकू येत नाही. दक्षिण गोव्यातून कॅप्‍टन विरिएतो फर्नांडिस यांच्या नावाचा विचार सार्दिन यांना पर्याय म्हणून केला जात आहे.

कॉंग्रेसमधील इच्छुकांचे धाबे दणाणले

कॉंग्रेसच्या गोटात मात्र उमेदवार कोण, याचाच प्रश्न पडला आहे. मतदानाला केवळ 40 दिवस राहिल्याने लोकसभा मतदारसंघातील 20 विधानसभा मतदारसंघांत सरासरी दोन दिवस दिले तरी वेळ पुरणार नसल्याने कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या दिवसाच्या काही दिवस आधी उमेदवारी जाहीर केली तर प्रचार करताना प्रत्येक गावात पोचणे कठीण होईल, असे आजचे चित्र आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Transport Minister Mavin Gudinho: क्षेत्रफळाच्या तुलनेत जास्त अपघात,अनेकजण मृत्युमुखी; रस्ते पाहणीसाठी तज्ज्ञ पाठवा

Goa Politics: काँग्रेस कार्यालयासमोरच राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Goa DGP: गोव्यात येण्याची गोलचा यांची इच्छा नाही; अन्य अधिकाऱ्यांच्या नावाचा शोध सुरू

Goa BJP: भाजप मुख्यालयाची पायाभरणी जे. पी. नड्डा यांच्या हस्ते

Goa Police: केसांना धरून ओढले, बूट चाटायला लावले, लाथांनी मारहाण केली!

SCROLL FOR NEXT