Candidates from Goa have luxurious and expensive cars Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील उमेदवारांकडे धावता पैसा

गोव्यातील नेत्यांना आलिशान आणि महागड्या गाड्यांची हौस

दैनिक गोमन्तक

गोव्यात विविध राजकीय पक्षांनी आपल्या पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहेत. यांपैकी काही उमेदवार हे साधेसुधे नसून चांगले गडगंज संपत्ती असलेले आहे. गोवा राज्यात गाड्यांचे वेड हा नवीन विषय नाही. बहुतेक घरात किमान एक चारचाकी आणि दोन दुचाकी असतातच. चारचाकी गाड्या जनमानसात रूढ झाल्या आहेत. राज्यातील काही नेत्यानांही आलिशान आणि महागड्या गाड्यांची हौस आहे. यामध्ये माजी मंत्री मिकी पाशेको यांचा पहिला क्रमांक प्रथम लागतो. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या सात आलिशान गाड्या आहेत. यामध्ये हार्ले डेव्हिडसन बाईक, मर्सिडीझ बेंझ सी 200, हमर एच 3, बीएमडब्ल्यू, मर्सिडीझ सी 200 यांचा समावेश आहे. यामध्ये गरजेपेक्षा 'स्टेस्टस सिम्बॉल' नीलेश काब्राल यांच्याकडे सर्वाधिक म्हणजे 41 गाड्या असल्या, तरी यामध्ये आलिशान एकही गाडी नाहीत. त्यांच्याकडे प्रामुख्याने टँकर, टिप्पर, ट्रक अशाच गाड्या आहेत. यात दोन वार्जचाही समावेश आहे.

कळंगुट मतदारसंघातील उमेदवार अँथोनी मिनेझीझ यांच्याकडे सहा गाड्या आहेत. त्यात हमर एच ३, मर्सिडीझ बेंझ इ 250, लँड रोव्हर, रेंज रोव्हर आदींचा समावेश आहे. मायकल लोबो आणि त्यांच्या पत्नी दिलायला लोबो यांच्याकडे 21 गाड्या आहेत. त्यात रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू मिनी कूपर या आलिशान गाड्या आहेत. पणजीचे मतदार संघाचे भाजप उमेदवार बाबूश आणि जेनिफर मोन्सेरात कुटुंबीयांकडे एकूण 16 गाड्या आहेत. त्यामध्ये मर्सिडीझ सी, मर्सिडीझ 350 डी, बीएमडब्ल्यू 325 यांचा समावेश आहे.

एल्टन डिकॉस्ता यांच्याकडे मर्सिडीझ बेंझ, बेंझ सीएलए 200 या आलिशान गाड्या आहेत. पर्वरीचे संदीप वरझकर आणि विकास प्रभुदेसाई, नावेलीचे आवेतन फुर्तादो, पेडण्याचे प्रवीण आर्लेकर यांच्याकडे मर्सिडीझ बेंझ गाड्या आहेत. सांताक्रूझचे रुडॉल्फ फर्नांडिस यांच्याकडे बीएमडब्ल्यू X6, ताळगावच्या टोनी रॉड्रिग्ज यांच्याकडे बीएमडब्ल्यू 320 डी तर वेळ्ळीच्या सावियो डिसिल्वा यांच्याकडेही बीएमडब्ल्यू गाडी आहे. म्हापशाचे जोशुआ डिसोझा यांच्याकडे एकूण सहा गाड्या असून, त्यात डुकाटी या स्पोर्टस बाईकचा समावेश आहे. हळदोणेचे ग्लेन टिकलो यांच्याकडे बीएमडब्ल्यू 530 या आलिशान गाडीसह एकूण 14 गाड्या आहेत. कुडतरीचे उमेदवार डॉमनिक गावकर यांच्याकडे बीएमडब्ल्यूसह 14 गाड्या आहेत. यांच्याकडे एकूण नुवेचे राजू काब्राल बीएमडब्ल्यू 530 डीसह एकूण 17 गाड्या आहेत. केपेचे दीपक ढवळीकर यांच्याकडेही एमडब्ल्यू जॅग्वार गाडी ही आलिशान गाडी आहे.

पाच लाखांचे घड्याळ; दहा लाखांचे चित्र

वेळ्ळीचे भाजपचे उमेदवार सावियो रॉड्रीग्ज यांच्याकडे पाच लाख रुपयांचे रोलेक्स कंपनीचे घड्याळ असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. विश्वजित राणे यांच्याकडे 10 लाखांचे चित्र व 25 लाखांचा कॅमेरा असल्याचे नमूद केले आहे. बेंजामिन सिल्वा यांच्याकडे 4, फ्रान्सिस सिल्व्हेरा यांच्याकडे 3 तर सावियो डिसिल्वा यांच्याकडे 2 मासेमारी ट्रालर्स आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hurricane Melissa Video: 'हरीकेन हंटर्स'ची धाडसी मोहीम! मेलिसा चक्रीवादळाच्या केंद्रातून केले जीवघेणे उड्डाण; पाहा थरकाप उडवणारा Video

IRCTC Goa Tour Package: बजेटमध्ये गोवा टूर! आयआरसीटीसी घेऊन आलंय जबरदस्त पॅकेज; 3 रात्री 4 दिवसांच्या सैरसाठी लगेच बुकिंग करा

Montha Cyclone Latest Update: 'मोन्था' चक्रीवादळानं धारण केलं रौद्र रुप, आंध्रच्या किनाऱ्यावर धडकणार, ताशी 110 किमी वेगाने वाहणार वारे; रेड अलर्ट जारी

Goa Tourism: सुट्टीसाठी गोव्यात जाताय? बसेल हजारोंचा दंड, गाडी चालवताना 'हे' नियम हवे तोंडपाठ

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारनं दिली मंजुरी, 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT