Laxmikant Parsekar
Laxmikant Parsekar Dainik Gomantak

मी हरलो तर राजकारणातून निवृत्ती घेईन: पार्सेकर

'मी जिंकलो तर 'त्यांनी' रिटायरमेंट घ्यावी', पार्सेकरांचा भाजपला अप्रत्यक्ष टोला
Published on

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांनी भाजपला (BJP) रामराम ठोकला आणि गोव्यात अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांना तिकीट यावेळी तिकट नाकारल्याने त्यांनी हा बंडखोर निर्णय घेतला. गोवा निवडणूक येत्या काही दिवसात होणार आहे. त्यामुळे गोव्यात सर्वच पक्षाच्या प्रचाराला वेग आला. त्याचबरोबर नेत्यांनी पक्षांच्या एकनिष्ठ राण्याच्या शपथविधीचा सपाटा सुरू केला आहे.

Laxmikant Parsekar
संगीतासाठी जसा रियाज आवश्यक आहे तसेच पेंटिंगमध्येही सरावाची गरज: निरुपा नाईक

दरम्यान एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना भाजपला अप्रत्यक्ष आव्हानच दिले आहे. त्यांनी या मुलाखती दरम्यान "मी हरलो तर राजकारणातून निवृत्ती घेईन आणि मी जिंकलो तर 'त्यांनी' रिटायरमेंट घ्यावी' असे मत व्यक्त केले आहे. गोव्यात पार्सेकरांचा मोठा चाहता वर्ग आहे आणि त्यांचा प्रचार मांद्रे (Mandrem) मतदारसंघात जोरात सुरू झाला आहे. गोव्याच्या राजकारणातील पार्सेकर हा अत्यंत जुना आणि अनुभवी चेहरा आहे.

Laxmikant Parsekar
पक्षांतरामुळे गोव्याच्या राजकारणात प्रचारादरम्यान रंगतोय शपथविधी सोहळा

दरम्यान मांद्रे मतदारसंघातून विद्यमान आमदार दयानंद सोपटे, माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर आणि मगोचे जीत आरोलकर या तगड्या उमेदवारांसमोर गोवा फॉरवर्डचे दीपक कळंगुटकर, आम आदमी पक्षाचे प्रसाद शहापूरकर, आरजीच्या सुनयना गावडे व शिवसेनेचे बाबली नाईक या नव्या चेहऱ्यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे सहा निवडणुकांचा (Goa Election 2022) अनुभव आहे, तर आमदार दयानंद सोपटे यांच्याकडे पाच लढतींचा अनुभव आहे. आणि मगोचे जीत आरोलकर यांना 2019 च्या पोटनिवडणुकीचा अनुभव आहे. या सर्वाचा अनुभव मांद्रेकरांना किती भावतो हे येणाऱ्या काळात गोवेकरांना समजणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com