Canacona municipality Dainik Gomantak
गोवा

काणकोण पालिकेला मिळणार नवी इमारत!

भवन उभारणी सुरू: पोर्तुगीजकालीन वास्तू पाडली

दैनिक गोमन्तक

काणकोण: काणकोण पालिकेची पोर्तुगीजकालीन इमारत मोडून त्याजागी पालिका भवन उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. केपे,फोंडा व काणकोण अशा पालिका क्षेत्रात काही प्रमाणात एकाच प्रकारचा आराखडा असलेल्या पालिका इमारती पोर्तुगीजांनी उभारल्या होत्या. सदर इमारत जीर्ण झाली होती,त्यामुळे नवीन प्रशस्त पालिका भवन इमारतीची पालिकेला गरज होती. सदर प्रकल्प उभारण्यासाठी जुनी इमारत पाडण्यात आली. सुमारे दहा कोटी रूपये खर्चून हे पालिका भवन उभारण्यात येणार आहे.

शुक्रवारी नगराध्यक्ष सायमन रिबेलो आपल्या नगराध्यक्षपदाचे एक वर्ष पूर्ण करणार आहेत.मात्र, गेल्या वर्षभरात पालिका क्षेत्रात विकासाच्या बाबतीत नकारात्मक घंटा वाजली.याचे खापर विद्यमान सत्ताधारी नगरसेवक व नगराध्यक्ष, माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्यावर फोडत आहेत. मात्र फर्नांडिस यांनी पालिका भवनासाठी आठ कोटी रूपयांचा निधी पालिकेला मंजूर करून दिला.आमदाराने पालिका क्षेत्राचा विकास करायचा असेल, तर नगरसेवक, नगराध्यक्ष यांची गरजच काय, असा सवाल माजी उपसभापती फर्नांडिस यांनी केला आहे.

गेल्या वर्षभरात माजी आमदार फर्नांडिस यांनी पालिकेला सहकार्य दिले नसल्याचे चावडी प्रभागाचे नगरसेवक रमाकांत नाईक व नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांनी सांगितले. आता सभापती रमेश तवडकर यांना पालिका क्षेत्राच्या विकासासबंधी १५ कोटी़ंचा प्रस्ताव दिला आहे, तो मंजूर होताच पालिका क्षेत्रात विकासाला चालना मिळेल,असे नगराध्यक्ष रिबेलो यांनी सांगितले.

पालिकेचा कारभार भाडोत्री वास्तूत

सध्या पालिका कार्यालय महिना चाररस्ता येथे एका भाड्याच्या इमारतीत हलविण्यात आले आहे. दरमहा सुमारे पन्नास हजार भाडेतत्वावर ही इमारत दोन वर्षांसाठी पालिकेने घेतली आहे. पालिका भवन प्रकल्प पूर्ण होण्यास किमान दोन वर्षाचा कालावधी लागण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT