Margao  Dainik Gomantak
गोवा

Margao : चांदर रास्ता रोको खटला रद्दबातल करा; विनंती अर्ज दाखल

कुडतरी पोलीसांनी 10 जणांवर दाखल केले होते आरोपपत्र

गोमन्तक डिजिटल टीम

Margao : चांदर येथे रेल रोको आंदोलनावेळी सार्वजनिक रस्ता अडविल्याबद्दल मायणा कुडतरी पोलीसांनी अभिजित प्रभुदेसाई आणि अन्य 9 जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. त्याची सुनावणी आज मडगाव न्यायालयात होती.

यावेळी आपल्यावर दाखल केलेले आरोप रद्दबातल करण्यात यावेत अशी मागणी करणारा विनंती अर्जं आज मडगाव न्यायालयाला सादर करण्यात आला.

पोलीसांनी जे आरोपपत्र दाखल केले आहे ते चुकीचे आहे. जिल्हाधिकऱ्यांच्या आदेशाने हा रस्ता त्या दिवशी बंद ठेवण्यात आला होता. जो रस्ता आधीच वाहतुकीसाठी बंद केला होता तो परत अडवून अडथळे निर्माण करणे कसे शक्य आहे असा सवाल करीत आपल्यावर दाखल केलेले आरोप रद्दबातल करण्यात यावेत अशी मागणीचा विनंती अर्जात करण्यात आली आहे.

या प्रकरणी प्रभुदेसाई यांच्या व्यतिरिक्त कॅ. विरीयातो फर्नांडीस, डायना तावारीस, विकास भगत, फ्रेडी त्रावासो, सबिता मास्कारेन्हास, संदेश तेलेकर, रॉयला फर्नांडीस, क्रेसन आंताव व जॉन कुतीन्हो यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. दरम्यान आता ही सुनावणी 1 मार्च रोजी होणार आहे.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वावरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे त्यांनी न केलेल्या कृत्याचेही आरोप ठेवून त्यांच्या विरोधात खटले कसे दाखल केले जातात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. आम्हाला अशा प्रकरणात गुंतवून आमचा वेळ वाया घालवणे हा सरकारचा एकमेव उद्देश असल्याचा आरोप आज प्रभुदेसाई यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT