Canacona hospital lift incident Dainik Gomantak
गोवा

Canacona: आरोग्य केंद्रात अडकली लिफ्ट, डायलेसीसच्या रुग्णांवर आली बेशुद्ध होण्याची वेळ; गोवा फॉरवर्डकडून तीव्र संताप व्यक्त

Canacona hospital lift incident: बंद लिफ्टमधून त्यांनी जोरदार आवाज केला पण आवाज ऐकून तिथे आलेल्या देखरेख कर्मचाऱ्यांकडे लिफ्टची चावी नसल्याने ते काहीच मदत करू शकले नाहीत.

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण: काणकोण आरोग्य केंद्रातील गलथान कारभारावर गोवा फॉरवर्डने तीव्र संताप व्यक्त केला असून केंद्रातील कारभार त्वरीत न सुधारल्यास आरोग्याधिकाऱ्यांना काणकोणकरांच्या रोषाचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला आहे.

गुरूवारी (ता.९) सकाळी सहा वाजता गुरू बांदेकर व चंद्रकांत पागी हे दोन डायलेसीसचे रुग्ण अर्ध्या तासांहून जास्त वेळ लिफ्टमध्ये अडकले होते. बंद लिफ्टमधून त्यांनी जोरदार आवाज केला पण आवाज ऐकून तिथे आलेल्या देखरेख कर्मचाऱ्यांकडे लिफ्टची चावी नसल्याने ते काहीच मदत करू शकले नाहीत.

त्यामुळे दोन्ही रुग्णांचा रक्तदाब वाढून त्यांच्यावर बेशुद्ध होण्याची पाळी आली. सुदैवाने, ३५ मिनिटांनी मिनीटांनी दोन भिंतीच्या मध्ये अडकलेली लिफ्ट पहील्या माळ्यावर जावून उघडली व रुग्ण बाहेर आले. आरोग्य केंद्रातील लिफ्ट बंद पडण्याची ही पहीलीच घटना नसून यापूर्वीही चार पाच वेळा लिफ्ट बंद पडून रुग्ण आत अडकले.

संकटावेळी लिफ्टची चावी सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे द्यावी व या कर्मचाऱ्यांना अशा घटना हाताळण्याचे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी प्रशांत नाईक यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'हॅलेलूया' म्हणणे नडले! हणजूण 'संडे मास'शी टेक्नो पार्टीची जाहिरात जोडणाऱ्यावर गुन्हा दाखल

Mapusa Crime: 22 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; ब्लॅकमेल करून पैसे लुटल्याची धक्कादायक घटना

Goa Rain: परतीच्या पावसाचा कहर! सत्तरीत वादळी वाऱ्यासह जबर तडाखा, वाळपईत ढगफुटी; Watch Video

Narkasur in Goa: "माझा मृत्यू..." नरकासुराने केली होती अनोखी मागणी, अजूनही गोव्यात का चालते दहनाची परंपरा?

Rama Kankonkar Assault: जोपर्यंत खऱ्या सूत्रधाराला अटक होत नाही, तोपर्यंत पोलिसांवर विश्वास नाही - रामा काणकोणकर

SCROLL FOR NEXT