Canacona Agriculture Dainik Gomantak
गोवा

Canacona: गावडोंगरी-काणकोण येथे काटेकणगांची लागवड, कंदमुळांकडे शेतकऱ्यांचा कल; यंदा 250 टनहून अधिक उत्पादनाची शक्यता

Canacona Agriculture: काणकोण तालुक्यात ऊस लागवडीवर मर्यादा आल्याने यंदा काटेकणगा व सुरण या कंदमुळांच्या लागवडीत लक्षणीय वाढ झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

काणकोण: काणकोण तालुक्यात ऊस लागवडीवर मर्यादा आल्याने यंदा काटेकणगा व सुरण या कंदमुळांच्या लागवडीत लक्षणीय वाढ झाली आहे. सुमारे दहा हेक्टर क्षेत्रात या पिकांची लागवड करण्यात आली असून गावडोंगरी पंचायत क्षेत्र आघाडीवर आहे. यंदा २५० टनांहून अधिक उत्पादनाची शक्यता आहे, अशी माहिती देण्यात आली.

अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवड बंद करून जमीन पडीक न ठेवता काटेकणगा लागवडीकडे वळण घेतले आहे. काही स्वयंसाहाय्य गटांकडून सामुदायिक शेतीद्वारे या पिकांचे उत्पादन घेतले जात आहे. गेल्यावर्षी काटेकणगाचा दर सुमारे ८० रुपये प्रतिकिलो होता. मात्र, बाजारपेठेअभावी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता.

उपाययोजना हव्या!

उत्पादन वाढत असताना योग्य बाजारपेठ मिळाली नाही तर शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागू शकतो. त्यामुळे गोवा बागायतदार व हॉर्टिकल्चर महामंडळाने काटेकणगासाठी स्थिर व खात्रिशीर बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कृषी विभागानेही या पिकाच्या विस्ताराला चालना देण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ECB New Rules: दारूला पूर्ण बंदी, सोशल मीडियावरही नियंत्रण! क्रिकेटपटूंसाठी बोर्डाचे 6 कडक नियम लागू, शिस्तभंगावर करडी नजर

VIDEO: "मनीषाशीच लग्न लावा, नाहीतर जीव देईन"; तरुणी चढली मोबाईलच्या टॉवरवर, समलैंगिक प्रेमप्रकरणाचा हायव्होल्टेज ड्रामा

Crime News: आईवर डोळा, मुलगा ठरला अडथळा; आठ वेळा जमिनीवर आपटून दीड वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

Rajpal Yadav Jail: राजपाल यादवच्या अडचणीत वाढ! चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा दणका, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

SCROLL FOR NEXT