Tragic Death Dainik Gomantak
गोवा

Canacona: सुपारी काढायला गेल्या, पाय घसरला अन पडल्या तळ्यात; ज्येष्ठ महिलेचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Canacona Drowning Death: सुपारी वेचायला गेलेल्या लक्ष्मी शेट (वय ७४ वर्षे) या देळे- शेटकर वाड्यावरील ज्येष्ठ महिलेचा तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

Sameer Panditrao

काणकोण: सुपारी वेचायला गेलेल्या लक्ष्मी शेट (वय ७४ वर्षे) या देळे- शेटकर वाड्यावरील ज्येष्ठ महिलेचा तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी घडली.

त्यांची दोन मुले सकाळीच कामासाठी गेली होती. सध्या काणकोणात कच्च्या सुपारीची गळती सुरू झाली आहे. त्यामुळे लक्ष्मी या गळालेल्या सुपाऱ्या वेचायला बागायतीमध्ये गेल्या होत्या. येथील तळ्यात काही सुपाऱ्या पडल्या होत्या.

त्या काढण्यासाठी त्या तळ्यात उतरल्या असता त्यांचा पाय घसरला आणि त्या तळ्यात पडल्या. त्यांना पोहता येत नसल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला, असे सूत्रांनी सांगितले.

शुक्रवारी स्थानिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चारच वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता, अशी माहिती मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Snake Viral Video: आरशावर उडाली विषाची कारंजी, स्वतःच्याच सावलीशी भिडला साप; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Surya Ketu Yuti 2026: सूर्याचं राशी परिवर्तन अन् केतुचा महासंगम! 'या' राशींना लागणार जॅकपॉट; बँक बॅलन्समध्ये होणार मोठी वाढ

Indian Boxer: 'मला नरेंद्र नावाचा तिरस्कार...', भारतीय बॉक्सरनं सांगितला पाकिस्तानी खेळाडूचा किस्सा; PM मोदीही हसून-हसून लोटपोट

संसदेत राडा! महिला खासदारानं पंतप्रधानांवर फेकली अंडी; म्हणाली, "तुम्हाला लाज वाटली पाहिजे..." Watch Video

Cricket Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! विजयी शॉटनंतर बॅट घेऊन प्रतिस्पर्ध्यावर धावला फलंदाज; इतर खेळाडू नसते तर... व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT