Accident Dainik Gomantak
गोवा

Canacona: मित्राला सोडण्यासाठी गेला पण परत आलाच नाही; काणकोण येथे 20 वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यू

अपघातात अन्य दोघेजण जखमी झाले आहेत

दैनिक गोमन्तक

Canacona Accident News: काणकोण येथे सोमवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात गंभीर जखमी एका 20 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. हा युवक मूळ कर्नाटकातील असून तो सध्या न्यूवाडा भाटपाल येथे राहत होता. एका मित्राला घरी पोहचवून येताना हा अपघात झाला. या अपघातात अन्य दोघे युवक जखमी झाले असून एकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काणकोण पोलिस स्थानकाचे निरीक्षक चद्रकांत गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीघे युवक आपल्या मित्राला घरी सोडण्यासाठी कर्वे येथे गेले होते. तेथून परत येत असताना  ट्रिपल सीट येत होते. यावेळी त्यांची बाईक एका वळणावर येताच रस्त्याच्या बाहेर जाऊन झाडाला धडकली.

या धडकेत पुंडलिक काकडे (20) हा युवक गंभीर जखमी झाला तर रोहित नाईक (19), गणेश दोड्डामनी (26) जखमी झाले. पुंडलिकला रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.

मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह त्याच्या नातेवाईकांकडे सुपुर्द करण्यात आला. पुंडलिक हा खासगी वाहन चालवत असे तर त्याचे आईवडिल घरोघर जाऊन भांडी विकण्याचा व्यवसाय करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: मोडसाय - बड्डे येथे घरातूनच चालायचा 'ड्रग्स'चा धंदा; गांजासह पोलिसांनी जप्त केली Airgun

GCA Election: रोहन गटाचा 'त्रिफळा'; चेतन-बाळूचा विजयी 'षटकार'; परिवर्तन गटाचा 6-0 फरकानं उडाला धुव्वा, पाटणेकरांचाही पराभव

Operation Sindoor: भारताने अमेरिकेचा मध्यस्थीचा प्रस्ताव धुडकावून लावला... 'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्याचा मोठा खुलासा VIDEO

'ओंकार' परतून गोंयात आयलो रे..! फकीर पाटो येथे केळीच्या बागेचे केले नुकसान; कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी

Goa Tourism: पर्यटन मंत्री खंवटे म्हणतात, 'टॅक्सी व्यावसायिकांना माफिया म्हणू नका'; गोवा आणि 'व्हिएतनाम'मधील पर्यटनाचा फरकही केला स्पष्ट

SCROLL FOR NEXT