Zambaulim Flood  Dainik Gomantak
गोवा

Margao: ‘अनियोजित’ विकासाचा फटका, वाहतूक बंद, विद्यार्थ्यांना सुट्टी

Shree Damodar College of Commerce and Economics: परिसर जलमय झाल्यामुळे आज विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याची वेळ महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावर आली

गोमन्तक डिजिटल टीम

जांबावली येथील श्री दामोदर समितीने जागा दिली म्हणून तेव्हा या महाविद्यालयाची छोटीसी इमारत बांधण्यात आली होती. आता त्याच परिसरात शेतजमिनीत भराव घालून विद्या विकास अकादमी, कायदा महाविद्यालय वगैरेसाठी वेगवेगळ्या तीन इमारती बांधण्यात आल्या आहेत. मात्र, त्या बांधताना भविष्याचा विचार करण्यात आलेला नाही, असे उद्योजक विवेक नाईक यांनी सांगितले.

कोंब-मडगाव येथील श्री दामोदर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाचा परिसर जलमय झाल्यामुळे आज विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याची वेळ महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावर आली. त्या परिसरात कोकण रेल्वे मार्गाखालून भुयारी मार्ग आहे तोही पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच कोलवा ते रेल्वे फाटकापर्यंतचा रिंग रोडचा रस्ताही पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

रस्ता अरुंद आहे, रस्त्याच्या बाजूला गटारे किंवा नाले नाहीत. हजारो विद्यार्थी शिकायला येतात त्यामुळे दररोज वाहतुकीचा खोळंबा होतो. साधनसुविधांचा विचार न करता एवढ्या मोठ्या प्रकल्पाला परवानगी देणे हे शहाणपणाचे आहे का, असा प्रश्र्न नाईक यांनी केला. शिवाय याच परिसरात अन्य कित्येक इमारती उभारल्या आहेत. त्यांची सांडपाणी जाण्यासाठी व्यवस्था केली आहे का, झोपडपट्टीला बाधा होऊ नये म्हणून अजून रिंग रोड होत नाही का, झोपडपट्टीतील लोकांचे दुसरीकडे पुनर्वसन करून रिंग रोड पूर्ण करण्याचे धारिष्ट्य स्थानिक आमदार का दाखवत नाही, असे प्रश्र्न नाईक यांनी उपस्थित केले.

दरम्यान, गेले कित्येक दिवस सतत पाऊस बरसत असल्याने अनेक ठिकाणी लोकांचे नुकसान झालेले आहे. या आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाचे दक्षिण गोव्याचे प्रभारी गिल सौझा यांच्या नेतृत्वाखाली मडगाव अग्निशमन दलाचे ए.के. वेळीप, एस.पी. देसाई, डी.एन. कोठारकर, एस.के.जी. देसाई व आर.एस. खुटकर यांनी रस्त्यावर तसेच भिंतीवर पडलेली झाडे हटविण्यात योगदान दिले.

अग्निशमन दलाची बचावकार्ये

फातोर्डा येथील शारदा क्लासिक रेस्टॉरंटजवळ मातीच्या घराची भिंत कोसळून ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. मडगाव अग्निशमन दलाने सुमारे एक लाख रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश मिळविले.

मुंगुल-मडगाव येथे ब्ल्यू हेवन रेस्टॉरंटजवळ घरावर झाड कोसळले. कोलमोरोड-नावेली येथे गॅरेजवर पडलेले सुके झाड तसेच डोंगरी-नावेली येथे अंतर्गत रस्त्यांवर पडलेले जंगली झाड मडगाव अग्निशमन दलाच्या जवानांनी हटविले.

फ्रोड्युलेम-नावेली येथे झेवियर चॅपेलजवळ कंपाऊंड वॉल तसेच वीज खांब व वीज वाहिन्यावर पडलेले डिंकाचे झाड अग्निशमन दलाच्या जवानांनी हटविले. त्यात सुमारे ४० हजारांचे नुकसान झाले.

घोगळ-मडगाव येथे बोलशे सर्कलजवळ कंपाऊंड भिंतीवर झाड पडल्याने सुमारे २० हजारांची हानी झाली. मडगाव अग्निशमन दलाने सुमारे दहा हजारांची मालमत्ता वाचविण्यात यश मिळविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fishing Boat Accident: काणकोणातील राजबाग किनाऱ्यावर पुन्हा बोट उलटली, स्थानिक मदतीसाठी धावले!

Viral Video: बिहारमधून दिसू लागला हिमालय आणि माऊंट एव्हरेस्ट; मनमोहक व्हिडिओ आला समोर Watch

Goa Politics: आमदार भाजपमध्ये जाणार नाहीत याची गॅरंटी द्या! ‘आप’चा काँग्रेससोबत युतीस स्पष्ट नकार

Shubhman Gill: "त्यांनी भारताला स्वबळावर अनेक सामने जिंकून दिले, आम्हाला त्यांची गरज..." नवा कर्णधार शुभमन गिलचे रोहित-विराटबाबत मोठं वक्तव्य

IND vs WI 2nd Test: टीम इंडियाला धक्का, दिल्ली कसोटीत जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर सस्पेन्स, 'या' खेळाडूला संधी मिळू शकते

SCROLL FOR NEXT