Shri Damodar Temple Zambaulim: ५६.६८ किलो सोन्याच्या दागिन्यांची अफरातफर

Goa Crime: जांबावली देवस्थानात १५.०९ कोटी रुपयांची अफरातफर झाल्‍याचा गुन्‍हा नोंद
Goa Crime: जांबावली देवस्थानात १५.०९ कोटी रुपयांची अफरातफर झाल्‍याचा गुन्‍हा नोंद
Crime News Dainik Gomantak

जांबावली येथील प्रसिद्ध श्री रामनाथ दामोदर देवस्थानात १५.०९ कोटी रुपयांची अफरातफर झाल्‍याचा गुन्‍हा आर्थिक गुन्‍हा विभागात आज नोंद झाला असून या प्रकरणी देवस्‍थान समितीच्‍या माजी समितीच्‍या सदस्‍यांसह सोनारावर गुन्‍हा नोंद केला आहे.

२०१६-१९ आणि २०१९-२२ सालासाठीच्या व्यवस्थापकीय समितीने १५.०९ कोटी रुपयांच्या पालखीच्या ५६.६८ किलो सोन्याच्या दागिन्यांची अफरातफर केली असल्‍याचे या तक्रारीत म्‍हटले आहे. आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी देवस्थानचे ॲटर्नी साईश हेगडे यांनी २७ ऑक्टोबर २०२३ रोजी केपे पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. ही तक्रार नंतर ईओसीकडे वर्ग करण्यात आली होती.

या तक्रारीनुसार देवस्थानच्या २०१६-१९ आणि २०१९-२२ या कालावधीत अध्यक्ष प्रकाश कुंदे, खजिनदार प्रशांत हेगडे, सचिव संदेश शेणवी कुंदे, ॲटर्नी दत्तप्रसाद अग्नी यांची व्यवस्थापकीय समिती होती. त्यानंतर ९ ऑगस्ट २०२२ रोजी नवीन व्यवस्थापकीय समिती आली. वरील कालावधीत आमसभेने सोन्याची पालखी करण्याचे ठरविले होते.

त्यानुसार त्या समितीने आभारण ज्वेलर्सला पालखी करण्यास सांगितले होते. वरील तत्कालीन समितीने याबाबतचा व्यवहार तसेच इतर माहिती नवीन समितीला दिली नव्हती. त्यानंतर चौकशी केली असता, तत्कालीन समितीने सोन्याच्या पालखीसाठी १५.०९ कोटी रुपयांच्या ५६.६८ किलो सोन्याची अफरातफर केल्याचे समोर आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

प्रकाश कुंदे, मंदिर व्‍यवस्‍थापन समितीचे माजी अध्‍यक्ष

दामोदर देवस्‍थान समितीचे विद्यमान अध्‍यक्ष मंजुनाथ दुकळे यांच्‍या विरोधात यापूर्वी आमच्‍या समितीने अफरातफरीची तक्रार दिली होती. त्‍यासंदर्भात सांगे न्‍यायालयात सुनावणीही चालू आहे. याचा वचपा काढण्‍यासाठीच दुकळे यांनी आपल्‍या दुसऱ्या सदस्‍याला पुढे काढून आमच्‍या विरोधात ही खोटी तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीत जो दावा केला आहे, त्‍यानुसार ५६ किलो सोन्‍याची अफरातफर झाली आहे. मात्र, त्‍याची किंमत फक्‍त १५.०९ कोटी रुपये एवढीच कशी होऊ शकते. जी सोन्‍याची पालखी केली आहे तीच मुळात १६ किलोची आहे. त्‍यामुळे ५६ किलो सोने नाहीसे कसे होऊ शकते. ही रक्‍कम ऑडिटरने काढल्‍याचे सांगितले जाते.

मात्र हा ऑडिटर खासगी असून त्‍याची नेमणूक करण्‍यासाठी सांगे मामलेदाराकडून परवानगी घेणे आवश्‍‍यक होते, परंतु तीही घेतली गेली नाही. वास्‍तविक असे ऑडिट करायचे झाल्‍यास ते सरकारी ऑडिटरकडून करणे आवश्‍‍यक होते. सध्‍याच्‍या समितीला आम्‍ही परत त्‍यांच्‍या विरोधात निवडणूक लढविणार याची भीती वाटल्‍यामुळेच हे कुभांड रचले गेले आहे.

Goa Crime: जांबावली देवस्थानात १५.०९ कोटी रुपयांची अफरातफर झाल्‍याचा गुन्‍हा नोंद
Mangeshi Temple: गोव्यातील लोकप्रिय मंगेशी मंदिरात असे पोहोचा

मंजुनाथ दुकळे, मंदिर व्‍यवस्‍थापन समितीचे विद्यमान अध्‍यक्ष

देवस्‍थानातील शेकडो वर्षांचे साेन्‍याचे दागिने, सोन्‍याची पालखी बनविण्‍यासाठी वितळविण्‍यात आले असे जरी तत्‍कालीन समितीकडून सांगितले गेले असले, तरी नवीन व्‍यवस्‍थापन समितीला या व्‍यवहाराबद्दल जुन्‍या समितीने कोणतीही माहिती दिली नव्‍हती. ज्‍यावेळी आम्‍ही फॉरेन्‍सिक तज्ज्ञांकडून कसून तपासणी केली. त्‍यावेळी त्‍या समितीने १५.०९ कोटी रुपयांच्या ५६.६८ किलो सोन्याची तफावत दाखवली. त्‍याच आधारे आम्‍ही पोलिसात तक्रार केली होती. आज ती तक्रार एफआयआर म्‍हणून नोंद करण्‍या आली आहे.

Goa Crime: जांबावली देवस्थानात १५.०९ कोटी रुपयांची अफरातफर झाल्‍याचा गुन्‍हा नोंद
मोदी सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात FIR, धार्मिक द्वेषाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप!

माजी व्यवस्थापकीय समितीविरोधात गुन्हा

ईओसीने देवस्थानच्या २०१६-१९ आणि २०१९-२२ या कालावधीतील अध्यक्ष प्रकाश कुंदे, खजिनदार प्रशांत हेगडे, सचिव संदेश शेणवी कुंदे, ॲटर्नी दत्तप्रसाद अग्नी यांची व्यवस्थापकीय समितीसह आभारण ज्वेलर्सचे मालक व इतरांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०३, ४०६, ४०९ आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी उपअधीक्षक फ्रान्सिस कोर्त यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजाशद शेख पुढील तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com