Sankhlim Municipality Election 2023 Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Municipal Council Election : साखळीत उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार सुरवात

चिन्हे मिळताच लगबग : घरोघरी भेटींबरोबरच सोशल मीडियावर प्रचाराचाच मजकूर

दैनिक गोमन्तक डिजिटल

साखळी नगरपालिका निवडणुकीत आता दहा प्रभागांसाठी मतदान होणार असल्याने सर्वच उमेदवार आपापल्या चिन्हांसह प्रचाराला लागले आहेत. या निवडणुकीत २० उमेदवार हे भाजप गट व टुगेदर फॉर साखळी गटाचे आहेत तर ११ उमेदवार अपक्षपणे आपली लढाई लढत आहेत. त्यांनीही आपल्या प्रचाराचा जोर लावला आहे.

निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची मुदत संपून अंतिम चित्रही स्पष्ट झाले. दोन नगरसेवक बिनविरोध निवडूनही आले. परंतु दोन्ही गटांनी अद्याप आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केलेली नाही. साखळी नगरपालिका क्षेत्रात कोण उमेदवार कोणत्या गटाचा याची जाणीव सर्वांना आहे. परंतु लोकही अधिकृत उमेदवारांच्या घोषणेची वाट पाहत आहेत.

उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झाली नसली तरी सर्व उमेदवारांनी आपल्या प्रचाराला प्रारंभ केलेला आहे. चिन्हे मिळाल्याने सर्व घरांमध्ये भेटी देत आपले चिन्ह तोंडी सांगत सुटले आहेत. तसेच लहानसहान बैठकांचेही सत्र सुरूच आहे. ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकून साखळी नगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने चांगलीच व्यूहरचना आखली आहे.

सर्व प्रभागांमध्ये निरीक्षक तसेच प्रभारी नेमून त्यापद्धतीने प्रभागांचा अहवाल दररोज घेणे सुरू आहे. तसेच मतदारांना आपल्या उमेदवारांच्या बाजूने वळविण्याचे विविध मार्ग अवलंबले जात आहेत.

भाजपला बदलाचा विश्‍वास

गेली दहा वर्षे डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार ते मुख्यमंत्री या प्रवासात साखळी नगरपालिका क्षेत्रात नगरपालिकेत सत्ता नसतानाही अनेक विकासकामे केलेली आहेत. साखळीला सर्व क्षेत्रात विकसित करून लोकांना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. या कामांवर व मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यावर लोकांना विश्वास असल्याने यावेळी साखळीत बदल घडणार व भाजपचीच सत्ता येणार, असा विश्वास भाजप मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर यांनी व्यक्त केला.

‘टुगेदर फॉर साखळी’ही आक्रमक

टुगेदर फॉर साखळी पॅनेलमधील नेतेही आक्रमकपणे आता निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांच्या गटातही बैठकांचे सत्र सुरू आहे. उमेदवारांना मार्गदर्शन करताना पद्धतशीरपणे प्रचार कसा करावा, याचे धडेही काही नवीन उमेदवारांना दिले जात आहेत. या गटाचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे. या निवडणुकीत टुगेदर फॉर साखळी पॅनेल पुन्हा सत्ता हस्तगत करणार आहे.

लोक जरी शांत व थंड असले तरी ते मतदानातून आपच्या बाजूने निकाल देणार आहेत. गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांच्या बळावर आम्ही या निवडणुकीत उतरलो आहोत, असे या गटातील नेते नगरसेवक धर्मेश सगलानी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT