BJP Bhuipal candidate  Dainik gomantak
गोवा

भुईपाल प्रभागात उमेदवाराच्या गैरहजेरीत भाजप कार्यकर्त्यांचा प्रचार

या प्रचाराचा शुभारंभ सकाळी भुईपाल चेकपोस्ट येथून करण्यात आला

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले : पर्ये मतदार संघात भारतीय जनता पक्षाची (BJP) उमेदवारी डॉ. दिव्या राणे यांना जाहीर झाल्यापासून त्यांच्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य पसरले आहे. त्यामुळे आज त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे कार्यकर्ते विविध माध्यमातून प्रचार करीत असल्याचे दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर यांच्या उपस्थितीत भुईपाल प्रभागातील असंख्य कार्यकर्त्यांनी घरोघरी भेटी देऊन त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.

या प्रचाराचा शुभारंभ सकाळी भुईपाल चेकपोस्ट येथून करण्यात आला, त्यानंतर भेडशेवाडा, डोबवडा व चोडणकर नगर या भागातील प्रत्येक घरांना भेटी देऊन पर्ये भाजप उमेदवार डॉ. दिव्या राणे यांच्या जाहीरनाम्याच्या प्रति वितरीत करण्यात आल्या. या वेळी महिला, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मतदारांनी भरघोस प्रतिसाद देऊन या निवडणुकीत डॉ. दिव्या राणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याची ग्वाही दिली असल्याचे माहिती जिल्हा पंचायत (Panchayat) सदस्य सगुण वाडकर यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT