Drink And Drive checking at Dabolim Airport two booked Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Rule: मद्यपी चालकांविरोधात मोहीम

Goa Traffic Rule: डिचोलीत कारवाई : नववर्षारंभीच तळीरामांना दणका

दैनिक गोमन्तक

Goa Traffic Rule: डिचोली वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर डिचोली पोलिसांचा वाहतूक विभाग अधिक सक्रिय झाला आहे. वाहतूक पोलिसांनी काल सोमवारी रात्री शहरात मद्यपी वाहनचालकांविरोधात खास मोहीम राबविली.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राबवलेल्या या मोहिमेदरम्यान मद्यपान केलेल्या वाहनचालकांना दणका बसला. त्यांच्याविरोधात गुन्हे नोंद करण्‍यात आले आहेत.

राज्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नववर्षाच्या पूर्वदिनी आणि नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मिळून वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात चौघांचे बळी गेले आहेत. या पार्श्वभूमीवर डिचोली पोलिसांनी विशेष मोहीम राबवली.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्कलजवळ रात्री 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात आली.

अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाच्या पोलिसांनी संशयित वाहनचालकांना अडवून त्यांची अल्कोमीटरद्वारे चाचणी केली असता, तीन ते चार वाहनचालकांनी मद्यपान केल्याचे आढळून आले. शिवाय हेल्मेट परिधान न केलेल्या वाहनचालकांविरोधातही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोघांमधील भांडण विकोपाला गेले, पत्नीने रागाच्या भरात पतीच्या अंगावर कढईतील उकळते तेल ओतले

Goa News Live: 2047 च्या पाण्याची गरज डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करणार; मंत्री शिरोडकर

'आर्मीकडून 4 लाख महिलांवर सामूहिक लैंगिक अत्याचार, ऑपरेशन सर्चलाईटमध्ये नरसंहार'; भारतानं युएनमध्ये उघडे पाडले पाकिस्तानचे क्रौर्य

Goa Crime: दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; कर्नाटकातील दोन युवकांना अटक, वास्को पोलिसांची कारवाई

Supermoon 2025: आकाशातील अद्भुत क्षण! आज गोव्यातून दिसणार 'सुपरमून', कुठे किती वाजता पाहता येईल?

SCROLL FOR NEXT