Calangute Shivaji Maharaj Statue Dainik Gomantak
गोवा

Calangute Shivaji Maharaj Statue: कळंगुट शिवपुतळा प्रकरण! सिक्वेरा यांनी माफी मागितली पण सोशल मिडियावर सुरू झालंय युद्ध

सरपंच जोसेफ यांनी या प्रकरणी नोटीस माघारी घेत असल्याचे सांगत माफी देखील मागितली.

Pramod Yadav

Calangute Shivaji Maharaj Statue Controversy: कळंगुट-साळगाव रस्त्यावर शिवस्वराज्य संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे.

शिवाजी महाराजांचा हा पुतळा दहा दिवसांत हटविण्यात यावा याबाबत कळंगुट पंचायतीने शिवस्वराज्य संघटनेला नोटीस बजावली.

यावरून शिवप्रेमी आज चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी कळंगुट पंचायत सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी महाराजांच्या पुतळ्यासमोर येऊन माफी मागावी अशी मागणी करत कळंगुट पंचायतीसमोर ठिय्या आंदोलन केले.

यावेळी जमाव काही प्रमाणात हिंसक देखील झाला. दरम्यान जोसेफ यांनी या प्रकरणी नोटीस माघारी घेत असल्याचे सांगत माफी देखील मागितली. पण, यासगळ्या प्रकरावरून आता सोशल मिडियावर युद्ध सुरू झाले आहे.

"कळंगुटमधील डॉल्फिन आणि रोनाल्डोचे पुतळे संस्कृती आणि इतिहासाशी सुसंगत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे गोव्यातील लोकांसाठी अधिक महत्त्वाचे आहेत."

"छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गोव्याच्या समृद्ध इतिहासाची आणि संस्कृतीची आठवण करून देणारा आहे. हे राज्याच्या हिंदू वारशाचे प्रतीक आहे आणि ते अनेक गोवावासीयांसाठी अभिमानाचे स्रोत आहे. कळंगुटमध्ये हा एकमेव पुतळा असावा. असे ट्विट अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या साहिल महाजन यांनी केले."

"गोव्याच्या समृद्ध इतिहासात आणि संस्कृतीत शिवाजी महाराजांनी कसे योगदान दिले हे तुम्ही मला सांगू शकाल का? आमचा अभिमानाचा स्रोत काय आहे हेही तुम्हाला माहीत नाही.

आमचा अभिमान आमच्या समाजाशी असलेले नाते आहे. शतकानुशतके येथे हिंदू आणि कॅथलिक शांततेत राहत आहेत." असे उत्तर एका व्यक्तीने या ट्विटला दिले आहे.

तसेच, महाराजांनी महाराष्ट्रासाठी खूप योगदान दिले आहे आणि मला त्याचा आदर आहे, मात्र त्यांचे नाव वापरून गोव्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे या व्यक्तीने आणखी ट्विट करत म्हटले आहे.

Calangute Shivaji Maharaj Statue

पोर्तुगीजांनी हिंदूंवर इंक्विझिशन लादलेल्या गोव्यातील प्रदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकले. शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने केलेल्या अनेक मोहिमांमुळे आणि नंतर संभाजी महाराज यांच्यामुळे गोव्यात हिंदू धर्म टिकला. असे ट्विट अमेय जोशी यांनी ट्विट केले आहे.

Calangute Shivaji Maharaj Statue

एका व्यक्तीने या प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे तसेच, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना संपर्क करून यावर तोडगा काढावा अशी मागणी केली.

दरम्यान, या प्रकरणी पंचायतीने नोटीस मागे घेतली असून, सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी माफी मागितली आहे. तुर्तास हे प्रकरण शांत झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: पणजीत पुलाच्या कामामुळे मुख्यमंत्री खोळंबले

Goa Waste Management: व्यवस्थापनाचा 'कचरा'! राजकीय इच्छाशक्तीचा अभाव

Vijay Sardessai: सरदेसाईंनी केली जुन्या फातोर्डा बाजाराची पाहणी; सोबतच सरकारवर सोडले टीकास्त्र

'Serendipity Arts Festival'मध्ये होणाऱ विशेष कार्यशाळा; पूर्ण माहिती जाणून घ्या इथे

Banking Fraud: खोटी कागदपत्रे बनवून बँकेची फसवणूक; 1 कोटी रुपये लंपास केल्याचा प्रकार उघडकीस

SCROLL FOR NEXT