Rape Case Dainik Gomantak
गोवा

Crime News: बागा येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना, मनोरुग्ण महिलेवर सामूहिक अत्‍याचार

पणजीतील महिला पोलिसांकडे प्रकरण वर्ग

दैनिक गोमन्तक डिजिटल

Baga : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बागा येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पश्‍चिम बंगालमधील एका मनोरुग्ण महिलेवर 18 ते 20 फेब्रुवारी दरम्‍यान सामूहिक बलात्कार झाल्‍याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला.

तसेच हे प्रकरण तपासासाठी पणजीतील महिला पोलिसांकडे वर्ग केल्याचे समजते. पीडिता मनोरुग्‍ण असल्याने तिचा गैरफायदा घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिस सूत्रांनी सांगितले, पीडिता आपल्या मित्रासोबत गोव्यात आली होती. ती बागा परिसरात त्याच्यासोबत राहत होती. 22 फेब्रुवारीला या महिलेने बसस्थानकावर दंगा केला. याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली होती.

पणजी पोलिसांना तिची मानसिक अवस्‍था बिकट वाटल्‍याने महिलेला बांबोळी येथील मनोरुग्ण इस्पितळात दाखल केले. तिच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विचारपूस केली असता, तिने तिच्यावर सहाजणांनी बलात्कार केल्याचे सांगितले.

त्‍यानंतर इस्‍पितळातर्फे घटनेची माहिती पोलिसांना देण्‍यात आली. कळंगुट पोलिसांनी पीडितेची प्राथमिक जबानी नोंदवत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेची जबानी नोंद करणे महत्त्वाचे

बलात्काराची तक्रार कळंगुट पोलिसांनी पणजी महिला पोलिसांकडे वर्ग केली असली तरी ती अजून मिळालेली नाही. कळंगुट पोलिसांनी तिची गोमेकॉ इस्पितळामध्ये वैद्यकीय तपासणी केली आहे की नाही हे प्रकरण महिला पोलिसांकडे आल्यावरच कळेल.

ती जबानी देण्याच्या स्थितीत असल्यास न्यायदंडाधिकाऱ्यासमोर तिची कलम 164 खाली जबानी नोंद करणे महत्त्वाचे आहे. हे प्रकरण आमच्याकडे आल्यावर पुढील चौकशी होईल, असे पोलिस निरीक्षक संध्या गुप्ता यांनी सांगितले.

चौकशी सुरू

पीडित महिलेची जबानी नोंदवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही ‘एनजीओंची’ही मदत घेतली जात आहे. ती महिला गोव्यात कशी आली? तिच्यासोबत कोण होते, याचा तपास पोलिस करत आहेत.

पीडितेची प्रकृती स्थिर नसून, ती जबानी देण्याच्या स्थितीत नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर जबानी नोंद करून संशयितांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT