'ड्राईव्हरच नाही', पहिली सोलर पॉवर फेरीबोट वापराविना, फळदेसाई म्हणतात आमच्याकडे...

13 ऑक्टोबर 2022 रोजी चोडण ते पणजी मार्गावर सोलर पॉवर फेरीबोट सुरू करण्यात आली.
Goa | Solar Ferry Boat
Goa | Solar Ferry BoatDainik Gomantak
Published on
Updated on

चोडण ते पणजी मार्गावर राज्यातील पहिली सोलर पॉवर फेरीबोट (Solar power Ferryboat) सुरू करण्यात आली. 3.9 कोटी रूपये खर्च करू सुरू करण्यात आलेली ही सोलर - ईलेक्ट्रीक हायब्रीड फेरीबोट वापराविना पणजीत पडून आहे.

या फेरीबोटमुळे चोडण ते पणजी (Panaji to Chorao) अंतर वीस मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. दरम्यान, सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

नदी परिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई (Minister Subhash Faldesai) यांनी याबाबत माहिती देताना सोलर पॉवर फेरीबोटसाठी कुशल मनुष्यबळ नसल्याचे सांगितले आहे. सोलर - ईलेक्ट्रीक हायब्रीड फेरीबोट ही पारंपारीक फेरीबोट नाही, त्यासाठी चालक कौशल्यपूर्ण असणे गरजेचे आहे.

या फेरीबोटच्या माध्यमातून उत्पन्न कसे मिळवता येईल याचा विचार सध्या आम्ही करत आहोत असे फळदेसाई म्हणाले. या उत्पन्नाच्या माध्यामातून फेरीबोटसाठी लागणारे मनुष्यबळाचे वेतन भागवता येईल. असे फळदेसाई म्हणाले.

Goa | Solar Ferry Boat
Crime News: गोव्याच्या राज्यपालांचे घर फोडणाऱ्या 'रॉबिनहूड'ला पुण्यात अटक

दरम्यान, 13 ऑक्टोबर 2022 रोजी चोडण ते पणजी मार्गावर सोलर पॉवर फेरीबोट सुरू करण्यात आली. चोडण येथे यासाठी रॅम्प देखील उभारण्यात आला तसेच, पणजीत देखील मांडवीत मार्ग उभारण्यात आला. सुरूवातीला 15 दिवस ही सेवा मोफत व त्यानंतर सशुल्क सेवा असेल असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले होते.

उत्पन्न निर्मितीसाठी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या फेरीबोटचा कसा वापर करता येईल याची चाचपणी सध्या पर्यटन खाते करत आहे. असे मंत्री फळदेसाई म्हणाले.

सोलर, डिझेलसह फेरीबोटसाठी तीन चार्चिंग पॉईंट आहेत. या फेरीबोटची प्रवासी क्षमात साठ एवढी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com